Women’s World Cup : महिला विश्वचषकात विक्रमांवर विक्रम, मिताली राजचा नवा विक्रम, ती ठरली पहिली खेळाडू
महिला एकदिवसीय विश्वचषकस्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्यासामन्यात आज भारतीय संघानं इंडिजला 155 रनानं हरवलं आहे. या भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होतंय. यामध्ये मिताली राजनं एक अनोखा विक्रम केला आहे. ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक (womens world cup) स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND Vs WI) सामन्यात आज भारतीय संघानं इंडिजला 155 रनानं हरवलं आहे. या भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होतंय. या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतलंय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय आहे. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरली होती. भारतीय संघानं (indian team) पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले होते. या सामन्यात स्नेह राणानं सगळ्यात जास्त 3 आणि मेघना सिंहनं 2 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. तिन सामन्यात भारतीय संघाचा हा दुसरा धडाकेबाज विजय आहे. यामध्ये मिताली राजनं एक अनोखा विक्रम केला आहे. ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मिताली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.
मितालीचा विक्रम
मिताली राजनं महिला विश्वचषकात कर्णाधर म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. हा विक्रम या पूर्वी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिनं आतापर्यंत कर्णधार म्हणून 23 सामने खेळले आहेत. संघाचे नेतृत्व करण्याचा मितालीला मोठा अनुभव देखील आहे. तिनं दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघातलं तिचं स्थान बळकट केलं आहे. यापूर्वी मितालीनं महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अशा 6 सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू म्हणून मान मिळवला होता. आता मितालीनं हा विक्रम केल्यानं ती थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन बसली होती.
झुलनची तुफान गोलंदाजी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतलंय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय आहे. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरल्याचं दिसतंय. भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले. भारतीय महिला संघाच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. 318 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिचनं आक्रमक मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
इतर बातम्या