Women’s World Cup : भारताकडून वेस्ट इंडिजची धुलाई, पाहा झुलन इंडिजला कशी धुतेय…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत सामना सुरू आहे. या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतेय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय आहे. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरल्याचं दिसतंय.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND Vs WI)यांच्यामध्ये महिला विश्वचषक (womens world cup) स्पर्धेत सामना सुरू आहे. या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतेय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय आहे. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरल्याचं दिसतंय. भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले आहेत. भारतीय महिला संघाच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. 318 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिचनं आक्रमक सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन (Deandra Dottin) आणि हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) या जोडीनं दमदार सुरूवात केली आहे. तर भारताची (Iindia) अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी या जोडीनं टार्गेट केलंय. झुलनच्या एका ओव्हरमध्ये त्यांनी 5 चौकारांसह 21 धावा काढल्या आहेत. दरम्यान, या महिला विश्वचषक सामन्यात 5 ओव्हर भारतीय टीमला चांगलीच महागडी ठरली आहे. आता पुढे काय होणार याकडे क्रिकेट (Cricket) प्रेमींचं लक्ष लागून आहे.
View this post on Instagram
एकाच सामन्यात दोन शतके
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शतकांचा विक्रमही मोडला. 1982 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये केवळ एकच शतक झळकावले होते. पण आता एकाच सामन्यात दोन शतके झाली आहेत. त्याचवेळी स्मृती मानधनाने वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले. 2017 च्या विश्वचषकातही त्याने याच संघाविरुद्ध शतक झळकावले होते.
इतिहास रचला जाणार!
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डपासून फक्त एक विकेट झुलन गोस्वामी दूर आहे. महिला क्रिकेट विश्वातील सर्वात अनुभवी बॉलर म्हणून ती ओळखली जाते. पण डॉटीन आणि मॅथ्यूज जोडीवर याचा काहीही फरक पडला नाही. आता पुढे काय होणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. वेस्ट इंडिजची आक्रमक खेळाडू असलेल्या डॉटीननं फक्त 35 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक झळकावले आहे. डॉटीनला स्नेह राणानं 62 रनवर आऊट केलं. तिनं 46 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हे रन केलेत. त्यानंतर मेघना सिंहनं नाईटला 5 रनवर आऊट करत टीम इंडियाला दुसरं यश मिळवून दिलंय.
इतर बातम्या