कोरोनाग्रस्तांच्या मदतीला युवराज सिंग, हजार बेड्स उपलब्ध करुन देणार
कोरोनाशी लढण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. यात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही पुढे आला असून कोरोनाग्रस्तांना 1000 बेड उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.
मुंबई : सध्या देशात कोरोनाची (Corona Wave) दुसरी लाट आली असल्याने सर्वचजण कोरोनाशी दोन-दोन हात करताना दिसून येत आहेत. समाजातील बहुतांश मंडळी आपआपल्यापरीने मदत करत असून सेलेब्रिटी, खेळाडूही मदतीसाठी पुढे आले आहेत. यातच भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या युवराज सिंगने (Yuvraj Singh) ही मदतीचा हात पुढे केला आहे. युवीने कोरोना रुग्णांसाठी 1000 बेड्स उपलब्ध करुन देण्याचा निर्धार केला आहे. युवराजची ‘यू व्ही कॅन’ (YouWeCan) ही सामाजिक संस्था समाजातील विविध घटकांना मदत करते. याच संस्थेकडून हे 1000 बेड्स उपलब्ध करुन देणार असल्याचं युवीने सांगितलं आहे. (Yuvraj singh Will give 1000 Beds to Hospital for Corona patients tweeted same)
युवराजने आपल्या ट्विटर हँडलवरुन (Yuvraj Singh Twitter) एक पोस्ट शेअर करत आपण देशातील विविध रुग्णालयांना 1000 बेड्स उपलब्ध करुन देणार असल्याच सांगितलं. या पोस्टमध्ये त्याने #Mission1000beds असा हॅशटॅग देत एक लिंक टाकली आहे. ज्यावर इच्छुक व्यक्ती ऑनलाईन पेमेंट करुन हवी तितकी मदत करु शकतात. युवीने या पोस्टला एक सुंदर कॅप्शन देखील दिलंय. ज्यात त्याने म्हटलंय, ‘एकटे आपण एक थेंब आहोत, पण सोबतीने एक समुद्र. सगळे मिळून एक मदतीचा सागर होऊन कुणाचं तरी आयुष्य बदलू.’
Alone we are one drop, together we are an ocean.
Let’s become the ocean of support that can make a difference to someone’s life ??#Mission1000Beds @youwecan @milaapdotorg #Milaap
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 2, 2021
मदतीला सुरुवात
युवराज सिंगने मदतीसाठी सुरुवात देखील केली आहे. काही दिवसांपूर्वी इंदौरमधील एमजीएम रुग्णालयाला (MGM Hospital, Indore) पत्र पाठवून युवराज सिंगच्या संस्थेनं रुग्णालयात १०० बेड्स वाढविण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रुग्णालयाचे डीन संजय दीक्षित यांनी युवराजची ही मदत स्वीकारली असल्याचंही सांगितलं होत.
हे ही वाचा
Free Corona Help | सोनू सूदने सुरू केली ‘फ्री कोरोना टेस्ट’ स्कीम, अशा प्रकारे करणार लोकांना मदत
‘प्यार का कोई धर्म नहीं होता…’ या भारतीय क्रिकेटपटूंनी झुगारली जातीधर्माची बंधनं!
(Yuvraj singh Will give 1000 Beds to Hospital for Corona patients tweeted same)