2500 रुपयांहून कमी किंमतीत 4G फोन, लिस्टमध्ये नोकियासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध

बऱ्याच वेळा कमी बजेटमुळे ग्राहक 2G फीचर फोन घेतात, ज्यामुळे त्यांना इंटरनेटच्या धिम्या स्पीडचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर फोन बद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत केवळ 3000 रुपयांपेक्षा कमी आहे.

2500 रुपयांहून कमी किंमतीत 4G फोन, लिस्टमध्ये नोकियासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध
tel Magic 2 4G
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 4:32 PM

मुंबई : मोबाईलमध्ये इंटरनेटच्या मदतीने आपण गरजेचा कंटेंट शोधू शकतो, हवी ती माहिती मिळवू शकतो, इतकंच काय तर करमणुकीसाठी YouTube किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतो. पण बऱ्याच वेळा कमी बजेटमुळे ग्राहक 2G फीचर फोन घेतात, ज्यामुळे त्यांना इंटरनेटच्या धिम्या स्पीडचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर फोन बद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत केवळ 3000 रुपयांपेक्षा कमीच नाही, तर हे फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतात. एवढेच नाही तर या फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचा पर्यायही आहे, जेणेकरून इंटरनेट इतर डिव्हाईसेससोबत शेअर करता येईल. (4G phones uder 2500 rupees, many options including Nokia in the list)

jio phone 4G

रिलायन्स जिओ फीचर फोन 4G सपोर्टसह येणारा सर्वात स्वस्त 4G फोन आहे. त्याची किंमत 1499 रुपये आहे. यामध्ये केवळ डिव्हाइसच नाही तर एक वर्षाचा रिचार्ज देखील मोफत उपलब्ध आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. या फीचर फोनमध्ये 2.4-इंच QVGA डिस्प्ले आहे. 128 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड टाकता येईल. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील आहे. रियर आणि फ्रंट पॅनलवर 0.3 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

Itel Magic 2 4G

Itel च्या या फोनमध्ये 2.4-इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 240 × 320 पिक्सेल आहे. हा एक 4G फोन आहे आणि तो या वर्षी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचे फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने युजर्स इतर डिव्हाईसेससोबत इंटरनेट शेअर करू शकतात. या फोनमध्ये Unisoc T117 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 64 MB रॅम आणि 128 MB इंटरनल स्टोरेज सह येतो. आवश्यक असल्यास, 64 जीबी पर्यंत एसडी कार्ड यात इन्सर्ट केले जाऊ शकते. बॅक पॅनलवर 1.3 मेगापिक्सेल कॅमेरा आणि यात 1900mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोनची किंमत 2,349 रुपये आहे. यात QWERTY कीपॅड आणि जॉयस्टिक कंट्रोल आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 2,425 रुपये आहे.

Nokia 4G phone

नोकिया 110 4G फोन VoLTE सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 128 MB रॅम आणि 48 MB स्टोरेज आहे. वापरकर्ते गरज पडल्यास 32 जीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात. चारकोल, अॅक्वा आणि यलो या तीन रंगांमध्ये येणाऱ्या या फोनची किंमत 2,799 रुपये आहे. यामध्ये गेम्स आणि टॉर्चसारखे आवश्यक पर्यायही देण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनलवर कॅमेरा आहे.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(4G phones uder 2500 rupees, many options including Nokia in the list)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.