भारतानंतर आणखी एक देशाचा चीनला झटका, Tiktok वर घातली बंदी

भारतात टिकटॉकवर आधीच बंदी आहे. आणखी एता देशाने टिक टॉकवर बंदी घातली आहे. या कारवाईनंतर टिकटोकवर बंदी घालणारा नवीनतम देश बनला आहे. ज्यावर 50 हून अधिक देशांमध्ये आधीच बंदी आहे.

भारतानंतर आणखी एक देशाचा चीनला झटका, Tiktok वर घातली बंदी
Tiktok
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 11:51 PM

Tiktok Banned : भारताचा शेजारी देश नेपाळने देखील टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या सरकारने कॅबिनेट बैठकीत चीनी  अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या माहिती आणि संचार मंत्री रेखा शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र ही बंदी कधीपासून लागू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या कारवाईनंतर मात्र टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या देशांच्या यादीत नेपाळचा ही समावेश झाला आहे. 50 हून अधिक देशांमध्ये आधीच यावर बंदी आहे.

नेपाळमध्ये TikTok वर बंदी

मंत्री रेखा शर्मा यांनी सांगितले की, “नेपाळमध्ये आजपासून TikTok वर धोरणात्मक स्तरावर बंदी घालण्यात आली आहे. तांत्रिक बाबींना थोडा वेळ लागेल. माहिती आणि दळणवळण मंत्रालय बंदी लागू करेल.  टिकटॉकवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंमुळे सामाजिक सलोख्याला बाधा येत असून सामाजिक नात्यात तेढ निर्माण झाली आहे. असं नेपाळ सरकारने म्हटले आहे.

सायबर गुन्हे वाढल्याने बंदी

नेपाळ पोलिसांच्या सायबर ब्युरोने गेल्या चार वर्ष आणि तीन महिन्यांत एकूण 1648 सायबर गुन्ह्यांची नोंद केली आहे. यापैकी बहुतेक टिकटोकशी संबंधित होते. टिक टॉकमध्ये आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही. सरकारने ‘सोशल नेटवर्किंगच्या गव्हर्नन्सवर दिशानिर्देश 2023’ सादर केल्याच्या काही दिवसांतच हा ताजा निर्णय आला आहे.

नवीन नियमांनुसार, नेपाळमध्ये सुरू असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेपाळमध्ये कार्यालय उघडणे किंवा तीन महिन्यांच्या आत प्रतिनिधी नियुक्त करणे आवश्यक आहे.

भारतासह अनेक देशांकडून आधीच बंदी

नेपाळ सरकारच्या नियमांनुसार, सोशल मीडिया साइट्सना माहिती आणि दळणवळण मंत्रालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केले जातील. उल्लेखनीय आहे की 2020 मध्ये गलवान खोऱ्यात हिंसाचारानंतर भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, अफगाणिस्तान, डेन्मार्क, नेदरलँड, न्यूझीलंड आणि कॅनडाने देखील टिकटॉकवर बंदी घातली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.