एअरटेलच्या ‘175 रिप्लेड’व्दारे अनुभवा 1983 विश्वचषकाचा रोमांच… 5G वर इमर्सिव्ह व्हिडिओसह होलोग्रामचे अनावरण
दरम्यान, इमर्सिव्ह व्हिडिओ तंत्रज्ञानाद्वारे, एअरटेलने 4K मोडमध्ये '175 रिप्लेड' पुन्हा तयार केले असून ज्यामुळे युजर्सना कपिल देव या आयकॉनिक क्रिकेटरच्या इनिंगचा पुन्हा अनुभव घेता येणार आहे.
दुरसंचार सेवांमध्ये दररोज नवनवी क्रांती होत आहे. त्यातच भारतातील आघाडीची असलेल्या एअरटेलने मंगळवारी 5G वर इमर्सिव्ह व्हिडिओचे (immersive video) अनावरण करीत भविष्यातील आपले दुरसंचार क्षेत्रातील क्रांतीकारी मनसुबे स्पष्ट केले आहेत. एअरटेलने इमर्सिव्ह व्हिडिओ अनुभव आणि भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा देशातील पहिला 5G पॉवर्ड होलोग्राम (hologram) देखील प्रदर्शित केला. 1983 च्या विश्वचषकादरम्यान कपिल देव (Kapil Dev) यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती, तेव्हा टीव्ही तंत्रज्ञांच्या संपामुळे त्या सामन्याचे कोणतेही व्हिडिओ फुटेज उपलब्ध नव्हते. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा रोमांच अनुभवता आला नव्हता. परंतु आता 5G वर पुन्हा कपिल देव यांच्या त्या खेळीचा आनंद घेता येणार आहे.
कसा आहे अनुभव
दरम्यान, इमर्सिव्ह व्हिडिओ तंत्रज्ञानाद्वारे, एअरटेलने 4K मोडमध्ये ‘175 रिप्लेड’ पुन्हा तयार केले असून ज्यामुळे युजर्सना कपिल देव या आयकॉनिक क्रिकेटरच्या इनिंगचा पुन्हा अनुभव घेता येणार आहे. 50 हून अधिक वापरकर्त्यांनी एअरटेल 5G चाचणी नेटवर्कशी कनेक्ट केलेल्या 5G स्मार्टफोन्सवर हा आनंद घेतला. 1Gbps पेक्षा जास्त वेग आणि 20 मिलीसेकंदांपेक्षा कमी विलंब मिळवण्याबरोबरच, त्यांच्याकडे कॅमेरा अँगल, 360-डिग्री इन-स्टेडियम व्ह्यू, शॉट स्टॅट्स आणि विश्लेषणाचा रिअल-टाइम ऍक्सेस आहे.
व्हिडिओ लिंक या प्रमाणे :
5G चमत्काराने अचंबित : देव
कपिल देव आपला अनुभाव सांगताना म्हणाले, मी 5G तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आश्चर्यचकित झालो आहे आणि माझा डिजिटल अवतार माझ्या चाहत्यांशी संवाद साधताना पाहून जणू मी तिथेच त्यांच्यासोबत असल्याचा अनुभव घेतला. धन्यवाद, एअरटेल. या अप्रतिम प्रयत्नाबद्दल आणि माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या खेळीपैकी एक जिवंत केल्याबद्दल मी आभारी आहे.
हा प्रयोग ‘गेम चेंजर’ ठरेल
भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन यांनी कार्यक्रमाच्या यशाबद्दल सांगितले की. 5G चा गिगाबिट वेग आणि मिलीसेकंद लेटन्सी मनोरंजनाचा वापर करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल, अशी आशा आहे. ‘175 रिप्लेड’ प्रयोगामुळे आम्ही केवळ 5G चे क्रांतीकारी बदल आणि डिजिटल जगामध्ये प्रवेश केला नसून भविष्यातील अनेक शक्यताही यातून वर्तविल्या आहेत. 5G आधारित होलोग्रामसह, आम्ही कुणाचाही व्हर्च्युअल अवतार कोणत्याही स्थानावर नेण्यास सक्षम आहोत. हे मीटिंग आणि कॉन्फरन्स, लाइव्ह बातम्यांसाठी ‘गेम चेंजर’ असेल. उदयोन्मुख डिजिटल जगात एअरटेल 5G साठी पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, 2021 मध्ये, ब्रँडने भारतातील पहिल्या ग्रामीण 5G चाचणीचे प्रदर्शन केले आणि विविध शहरांमध्ये इतर अनेक 5G चाचण्यांचे आयोजन केले. एअरटेलने भारतातील दोन प्रो गेमर Mortal आणि Mamba सह एअरटेल 5G चाचणी नेटवर्कवर क्लाउड गेमिंगचे प्रात्यक्षिक देखील केले. गेल्या वर्षी, कंपनीने आपला #5GforBusiness उपक्रम देखील आणला होता, ज्यामध्ये एंटरप्रायझेससाठी 5G आधारित सोल्यूशन्सची चाचणी घेण्यासाठी आघाडीच्या जागतिक सल्लागार आणि तंत्रज्ञान ब्रँड आणि कंपन्यांसोबत सामील होताना दिसत आहे.
(ही स्पॉन्सर्ड पोस्ट आहे)