इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना ‘बीएसएनएल’ची खुशखबर
मुंबई : ‘बीएसएनएल’ने सप्टेंबर महिन्यात लाँच केलेल्या प्लॅनची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 जानेवारी 2019 पर्यंत या प्लॅन अंतर्गत रिचार्ज करता येणार आहे. हा प्लॅन 14 नोव्हेंबर रोजी संपणार होता. मात्र, बीएसएनएल कंपनीने या प्लॅनची मुदत वाढवली आहे. या प्लॅन अंतर्गत युजर्सला प्रतिदिन 2.2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा असा […]
मुंबई : ‘बीएसएनएल’ने सप्टेंबर महिन्यात लाँच केलेल्या प्लॅनची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 जानेवारी 2019 पर्यंत या प्लॅन अंतर्गत रिचार्ज करता येणार आहे. हा प्लॅन 14 नोव्हेंबर रोजी संपणार होता. मात्र, बीएसएनएल कंपनीने या प्लॅनची मुदत वाढवली आहे.
या प्लॅन अंतर्गत युजर्सला प्रतिदिन 2.2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा असा की, कोणत्याही बीएसएनएल युजरने 1 जीबी डेटा प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर त्याला त्यावर 2.21 जीबी डेटा प्रतिदिन मिळणार आहे. बीएसएनएलने यासोबत दोन नवीन प्लॅन्स देखील आणले आहेत. यामध्ये 1,669 आणि 2,099 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. हा फायदा प्रीपेड आणि पोस्टपेड असा दोन्ही युजर्सला घेता येईल. तसेच, 186, 429, 485, 666 आणि 999 रूपयांचा रिचार्ज केल्यानंतर प्रत्येक रिचार्जवर प्रतिदिन 2.21 जीबी डेटा मिळणार आहे.
बीएसएनएलच्या एसटीव्हीनुसार(Space Tariff Vouchers) प्रीपेड युजर्ससाठी 1,699 रूपयांच्या प्लॅनची मुदत 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये प्रतिदिन 2 जीबी डेटा मिळणार आहे. तर 2099 रुपयांच्या रिचार्जची मुदत 365 दिवसच असणार आहे. मात्र, यावेळी युजर्सला प्रतिदिन 4 जीबी डेटा मिळणार आहे.