निम्म्या किमतीत खरेदी करा आयफोन 13… फ्लिपकार्टवर मिळतेय बंपर सूट

आयफोन अत्यंत महाग असल्याने तो घेणे अनेकांना परवडत नसते. परंतु आता हा फोन घेउ इच्छुकांची ही समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण फ्लिपकार्ट इलेक्ट्रोनिक्स सेल डीलमध्ये हा फोन तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये घेण्याची संधी चालून आली आहे.

निम्म्या किमतीत खरेदी करा आयफोन 13... फ्लिपकार्टवर मिळतेय बंपर सूट
निम्म्या किमतीत खरेदी करा आयफोन 13
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:49 PM

आयफोन 13 हा जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आयफोन 13 ला (iPhone 13) मोठी मागणी देखील आहे. जबरदस्त लूक, स्पेसिफिकेशन्स, सिक्युरिटी फीचर्समुळे ॲप्पल आयफोन 13 ची किंमतदेखील तेवढीच महाग आहे. त्यामुळे अनेक लोकांची इच्छा असूनही केवळ पैशांअभावी अनेक जण हा महागडा स्मार्टफोन (Expensive smartphones) खरेदी करु शकत नाहीत. आयफोन अत्यंत महाग असल्याने तो घेणे अनेकांना परवडत नसते. परंतु आता हा फोन घेउ इच्छुकांची ही समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण फ्लिपकार्ट इलेक्ट्रोनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) डीलमध्ये हा फोन तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये घेण्याची संधी चालून आली आहे. या डीलअंतर्गत तुम्ही हा आयफोन 13 केवळ 41 हजार 900 रुपयांना खरेदी करु शकणार आहात. सध्या आयफोन 13 ची किंमत 74 हजार 900 रुपये इतकी आहे.

काय आहे डील

भारतीय ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्टने एक चांगली डील उपलब्ध करुन दिली आहे. या डीलअंतर्गत युजर्स आयफोन 13 ला केवळ 41 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करु शकणार आहे. या डीलचा लाभ घेण्यासाठी युजर्सना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. या डीलमध्ये एक्सचेंज ऑफर, डिस्काउंट ऑफर, बॅंक कार्डवर मिळत असलेल्या सूट आदी सवलतींचा समावेश आहे. ग्राहकांना या ठिकणी इएमआयचा पर्याय मात्र मिळणार नाही. संपूर्ण पेमेंट करावे लागणार आहे.

आयफोन 13 वर बंपर सूट

जर तुम्हाला या डीलअंतर्गत फायदा घ्यायचा असेल तर, फोन एक्सचेंजच्या रुपात तुम्हाला 33 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. ही सूट तुमचा सध्याचा फोनची कंडिशन पाहून देण्यात येणार आहेत. या शिवाय तुम्हाला 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे. यामुळे आयफोन 13 ची किंमत अधिक स्वस्त होणार आहे. एवढी सूट मिळविल्यानंतर देखील पेमेंटसाठी तुम्ही काही निवडक क्रेडिट वा डेबिट कार्डचा वापर करुन अजून सूट मिळवू शकणार आहात.

हे सुद्धा वाचा

कार्डवरुन पेमेंट केल्यावर मिळेल सूट

आयफोन 13 खरेदीसाठी जर तुम्ही एचडीएफसी बॅंकचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरुन पेमेंट करणार असाल तर, त्यावर तुम्हाला 4000 रुपयांचा अतिरिक्त सूट मिळणार आहे. जर तुम्ही फ्लिपकाट ॲक्सिस बॅंक कार्ड युजर असाल तर खरेदीवर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. या ठिकाणी सांगण्यात आलेल्या सवलतींमध्ये तुम्ही तुमचा आवडता आयफोन 13 सवलतीच्या दरात खरेदी करु शकणार आहात.

ॲप्पल आयफोन 13 चे स्पेसिफिकेशन्स

आयफोन 13 मध्ये युजर्सना 6.10 इंचाचा डिसप्ले आणि 1170 बाय 2532 पिक्सल रिझोल्यूशन मिळणार आहे. फोन हेक्सा कोर ॲप्पल A 15 बाओनिक चिपसेट सपोर्टसह उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट डीलमध्ये आयफोन 13 128 GB वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन १२ मेगापिक्सल डयुअल कॅमेरा सेटअप आणि व्हिडिओ कॉल व सेल्फीसाटी फ्रंटला 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह उपलब्ध आहे. हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.