Reliance Jio: जुन्या नव्हे कमी किंमतीत खरेदी करा Jio चे प्रीपेड प्लॅन्स

रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सनी अलीकडेच त्यांचे प्रीपेड प्लॅन्स महाग केले आहेत. प्लॅन महाग झाल्यानंतर रिलायन्स जिओचे टॅरिफ चार्जेस 21 टक्क्यांनी महाग झाले आहेत. पण तरीही तुम्ही त्यांचा प्रीपेड प्लॅन स्वस्तात खरेदी करू शकता.

Reliance Jio: जुन्या नव्हे कमी किंमतीत खरेदी करा Jio चे प्रीपेड प्लॅन्स
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 6:30 AM

मुंबई : रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम ऑपरेटर्सनी अलीकडेच त्यांचे प्रीपेड प्लॅन्स महाग केले आहेत. प्लॅन महाग झाल्यानंतर रिलायन्स जिओचे टॅरिफ चार्जेस 21 टक्क्यांनी महाग झाले आहेत. पण तरीही तुम्ही त्यांचा प्रीपेड प्लॅन स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही Reliance Jio चा प्लॅन पूर्वीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. रिलायन्स जिओ आपल्या तीन प्रीपेड प्लॅनसह JioMart महा कॅशबॅक (JioMart Maha Cashback) ऑफर देत आहे. (Buy Reliance Jio’s prepaid plans at a lower price than the old ones)

यासह, तुम्हाला प्लॅन घेतल्यावर 20% चा कॅशबॅक दिला जातो. ही कॅशबॅक ऑफर कंपनीच्या 719 रुपये, 666 रुपये आणि 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह दिली जात आहे. यासाठी तुम्हाला JioMart महा कॅशबॅक सेक्शनमध्ये कोणताही एक प्लॅन निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला JioMart कॅशबॅक चेक बॅलन्सवर टिक करावे लागेल. येथे तुम्हाला JioMart कॅशबॅक बॅलन्स आणि तुम्ही या व्यवहारासह जास्तीत जास्त रक्कम रिडीम करू शकता हे सांगितले जाईल. तुम्ही त्यात जास्तीत जास्त रिडीम अमाउंट भरा.

719 रुपयांच्या प्लॅनवर 144 रुपयांची सूट

रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या प्लॅनसह, तुम्हाला 143.80 रुपयांची सूट दिली जात आहे. यासह, या प्लॅनची ​​किंमत जवळपास 575 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे हा प्लॅन आधीच्या प्लॅनपेक्षाही स्वस्त होतो. या प्लॅनची आधी किंमत 599 रुपये इतकी होती.

या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तुम्ही 666 रुपये आणि 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर देखील असेच फायदे घेऊ शकता.

1 रुपयाचा रिचार्ज

मुकेश अंबानींच्या मालकीच्या कंपनीने भारतीय युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, ज्या अंतर्गत युजर्स केवळ 1 रुपयाच्या साध्या रिचार्जवर 100 MB डेटा मिळवू शकतात. मात्र हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अद्याप लिस्ट करण्यात आलेला नसला तरी या रिचार्जचा पर्याय MyJio अॅपवर पाहायला मिळत आहे.

इतरही स्वस्त रिचार्ज उपलब्ध

हा Jio चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त जिओ प्लॅन आहे, जो 4G पॅकसह येतो. हा प्लॅन अशा वेळी आला आहे जेव्हा कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ केली होती. सध्या, जर तुम्हाला एका महिन्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा असेल, तर तुम्हाला 155 रुपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना फक्त 2 GB डेटा आणि 155 रुपयांचा प्लान मिळतो.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Buy Reliance Jio’s prepaid plans at a lower price than the old ones)

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....