शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

Oppo ही स्मार्टफोन निर्माती कंपनी Flipkart वर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal sale) मध्ये सहभागी होत आहे. म्हणजेच या सेलदरम्यान Oppo च्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी
Oppo A12
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 8:30 AM

मुंबई : Oppo ही स्मार्टफोन निर्माती कंपनी Flipkart वर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal sale) मध्ये सहभागी होत आहे. म्हणजेच या सेलदरम्यान Oppo च्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. येथे आम्ही फ्लिपकार्टवर लाईव्ह होणाऱ्या सर्व डीलपैकी एका जबरदस्त फोन डीलबद्दल सांगत आहोत. Flipkart ने Oppo A12 वर एक शानदार डील सादर केली आहे. हा एक किफायतशीर फोन आहे जो 2020 मध्ये लाँच झाला होता. तुम्ही आता Oppo A12 खरेदी केल्यास त्यावर 2240 रुपयांची सूट मिळेल. (Flipkart Big Bachat Dhamaal sale : buy Oppo A12 with 2240 Rupees discount)

Flipkart वरील हॉट डील म्हणजे तुम्ही Oppo A12 वर 2240 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या डीलमुळे तुम्ही या फोनचे बेस मॉडेल 8,750 रुपयांमध्ये खरेदी करु शकता, जे MediaTek Helio P35 Processor सह सुसज्ज आहे. तसेच तुम्ही 4 GB RAM आणि 64 GB ROM असलेलं मॉडेल 9,750 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या मॉडेलची मूळ किंमत 11,990 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे,

Oppo A12 या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा वॉटरड्रॉप डिस्प्ले आणि मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. दरम्यान, तुम्ही हा फोन खरेदी करताना Flipkart Axis Bank Credit Card द्वारे पेमेंट केलंत तर तुम्हाला आणखी 5 टक्के डिस्काऊंट (कॅशबॅक) मिळेल.

Oppo A12 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A12 मध्ये मीडियाटेक पी 35 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 6.22 इंचाची वॉटर ड्रॉप स्क्रीन आहे. ज्याचे रिझॉल्यूशन 1520 X 720 पिक्सल आहे. या स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89 टक्के आहे तर आस्पेक्ट रेश्यो 19.9 आहे. या फोनच्या डिस्प्ले सेफ्टीसाठी यामध्ये कॉर्निंग गोरीला ग्लास 3 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. या हँडसेटच्या रियर पॅनेलवर 3 डी डायमंड ब्लेज डिझाईन देण्यात आली आहे. हा फोन ब्लू आणि ब्लॅक दोन रंगात उपलब्ध आहे

डुअल कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास याच्या बॅक पॅनेलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलची लेन्स आहे. कंपनीने म्हटले की, या मोबाइलमध्ये 6 एक्स डिजिटल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर फिचर्स

हा एक ड्युअल सिम सपोर्ट असलेला फोन आहे. तसेच यात 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह मायक्रोएसडी कार्ड स्लॉटदेखील देण्यात आला आहे. फोनची मेमरी स्पेस कमी वाटत असेल तर युजर्स यात 256 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड जोडू शकतात. या फोनमध्ये 4230 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक फीचर आणि रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Flipkart Big Bachat Dhamaal sale : buy Oppo A12 with 2240 Rupees discount)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.