जवळपास पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत
भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे (Gmail and YouTube down in India).
मुंबई : भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद पडली. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले. दरम्यान, पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत झाली (Gmail and YouTube down in India).
भारतात रविवारी दुपारी अचानक जीमेल आणि यूट्यूब सेवा डाऊन झाली. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले. प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटरच्या माहितीनुसार गुगल, यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं समोर आलं. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आती ही सेवा पूर्ववत झाली आहे.
नेमकं कारण काय?
यूट्यूब आणि जीमेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत होती. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद पडल्या. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प झाल्या. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत होत्या. मात्र, अखेर पाऊण तासांनी या सेवा सुरु झाल्या.
यूट्यूबकडून स्पष्टीकरण
“यूट्यूब वापरताना अनेकांना अडचणी येत असल्याची माहिती आमच्या निदर्शनास आली आहे. आमची टीम सर्व यावर काम करत आहे. सर्व सुरळीत झाल्यावर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देऊ”, असं युट्यूबने ट्विटरवर सांगितलं.
We are aware that many of you are having issues accessing YouTube right now – our team is aware and looking into it. We’ll update you here as soon as we have more news.
— TeamYouTube (@TeamYouTube) December 14, 2020
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
गुगल, जीमेल, यूट्यूब डाऊन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा अक्षरक्ष: पाऊस पडला. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीतच ट्विटरवर 81 लाखांपेक्षा जास्त ट्विट यूट्यूब डाऊन विषयी झाले. त्याचबरोबर 27 हजारांपेक्षा जास्त ट्विट हे गुगल डाऊन विषयी करण्यात आले. ट्विटरवर तर यूट्यूब आणि गुगल डाऊन हे विषय ट्रेडिंगला आले.
#YouTubeDOWN @YouTube 2020 got youtube too! pic.twitter.com/IiVyJZgQVy
— Being_Pndu (@SarbjotSingh16) December 14, 2020
#YouTubeDOWN everybody and they mama running to see if youtube is actually down or if it’s just they wifi #YouTubeDOWN @YouTube pic.twitter.com/dI2t6SaM45
— Pratham Prem (@_prathamprem_) December 14, 2020
Ummm… @TeamYouTube? What’s going on?#YouTubeDOWN pic.twitter.com/vKm5PQMcXh
— ILuvGemz (@gemz_luv) December 14, 2020