गुगलने ‘या’ दहा अॅप्सवर घातली बंदी.. यूजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप !
आपल्या स्मार्ट फोनमध्ये दिवसभरात आपण अनेक अॅप्सचा वापर करतो. याशिवाय ‘गुगल’ चाही वापर अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपण करतो. गुगलने युजर्सच्या सुरक्षेचा विचार करीत, नुकतेच 10 लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली आहे, ‘त्या’ अॅप्सवर यूजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप आहे. ‘वॉल स्ट्रीट जनरल’ च्या अहवालानुसार, बॅन अॅप आतापर्यंत लाखो युजर्सने अनेक वेळा डाउनलोड केले आहे. रिपोर्टनुसार, गुगलच्या बॅन अॅपच्या मदतीने हॅकर्स युजर्सचे नेमके लोकेशन शोधण्यात यशस्वी ठरले होते.
सध्या गुगल ही जगातली सर्वांत मोठी सर्च इंजिन कंपनी आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट ‘गुगल’ अतिशय उपयुक्त (Very useful) ठरत आहे. गूगल अनेक सिक्युरिटी तपासण्यांनंतर गुगल प्ले स्टोअरवर अॅपला एंट्री देते. परंतु, अनेक धोकादायक अॅप्स (Dangerous apps) या सुरक्षा तपासण्यांना मागे टाकतात आणि ‘गुगल अॅप स्टोअर’ वर प्रवेश करतात. गूगल प्ले स्टोअरवरील सुमारे 10 असे अॅप्स आहेत, जे वापरकर्त्यांसाठी (For users) वापरणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे गूगलने हे अॅप्स Google Play Store वरून काढून टाकले आहेत. तुम्ही देखील हे अॅप्स फोनमधून लगेच डिलीट करा असा सल्ला गूगलने दिला आहे.
रिपोर्टनुसार, गुगलच्या बॅन अॅपच्या मदतीने हॅकर्स युजर्सचे नेमके लोकेशन शोधू शकतात. तसेच या अॅप्सचा वापर करून ई-मेल, फोन नंबर, पासवर्डची चोरी होऊ शकते. त्यामुळे हॅकर्स बँकिंग फसवणुकीच्या घटना घडवू शकतात. या अॅप्सच्या मदतीने कट आणि पेस्टद्वारे डेटा चोरी होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही OTP किंवा इतर तपशील कॉपी-पेस्ट करता तेव्हा हॅकर्स या अॅप्समधून तपशील चोरतात.
गूगलनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की गूगल प्लेवरची सर्व अॅप्स कंपनीची पॉलिसी आणि गाइडलाइन्सनुसारच चालवावी लागतील. कोणत्याही अॅपने कंपनीच्या स्टँडर्ड्सचं उल्लंघन केलं तर त्यावर आवश्यक कारवाई केली जाईल. गूगलनं कारवाई केलेल्या अॅप्समध्ये अल मोझिन आणि किब्ला कंपास यांसारख्या एक कोटीं अधिक डाउनलोड्स असलेल्या मुस्लिम प्रेअर अॅप्सचाही समावेश आहे. गूगलनं ही दोन्ही अॅप्स बॅन केली आहेत. ती अॅप्स युझर्सचे फोन नंबर, नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि IMEI चोरी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या अॅप्सवर घालण्यात आली बंदी
Speed Radar Camera AI-Moazin Lite (Prayer times) Wi-Fi Mouse (Remote Control PC) QR & Barcode Scanner (Developed by AppSource Hub) Qibla Compass – Ramadan 2022 Simple Weather & Clock Widget (Developed by Difer) Handcent Next SMS- Text With MMS Smart kit 360 Full Quran MP3-50 Languages & Translation Audio Audiosdroid Audio Studio DAW
इतर बातम्या
‘Google Mapच्या नवीन फीचरमुळे प्रवास अधिक सोपा! कसं वापरायचं नवं फिचर? जाणून घ्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर