Googleने आणले मोठे अपडेट, सर्च रिझल्टमधून वैयक्तिक माहिती काढून टाकणे झाले सोपे
जर तुम्हीही गुगल वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी गुगलने एक मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सर्च रिझल्टमधून काढून टाकू शकता. याशिवाय, आवश्यक असल्यास तुम्ही ते अपडेट देखील करू शकता.

गुगलवर आपल्याला प्रत्येक गोष्टींची माहिती मिळते. गुगल हे असे सर्च इंजिन आहे ज्याद्वारे आपल्याला संपूर्ण जगभरातील माहिती मिळवता येते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची माहिती देखील शोधून काढू शकतो. अशात तुमची किंवा इतर कोणाची वैयक्तिक माहिती सर्च रिजल्टमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला तुमची एखादी माहिती काढून टाकायचे असेल किंवा एखादी माहिती त्यामध्ये अपडेट करायची असेल तर तुम्ही ते सहजपणे करू शकता. कारण आता गुगलने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या संरक्षणासाठी खास टूल लाँच केले आहे. गुगलने त्यांचा इंटरफेस बदलला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमची माहिती अपडेट करायची असेल किंवा काढून टाकायची असल्यास ते टूल्स कसे काम करते याबद्दल जाणून घेऊयात…
गुगल सर्चमधून तुमची माहिती कशी काढून टाकायची
आता जर तुम्ही गुगलवरील सर्च रिझल्टसमोर दिसणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक केले तर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसेल. येथे तुम्ही माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकता. त्यानंतर तुम्हाला It shows my personal info, I Have a legal remove request आणि its outdated I want to request a refresh असे तीन पर्याय दिसतील. तुम्ही यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
ही सुविधा तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
It shows My Personal Info
या पर्यायात तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, घराचा पत्ता, लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि क्रेडिट कार्ड नंबर यासारख्या गोष्टी काढून टाकू शकता. तुमच्या विनंतीचे Google कडून रिव्ह्यू केले जाईल आणि तुमचे वैयक्तिक माहिती काढून टाकले जातील.
I Have a Legal Remove Request
या पर्यायात तुम्हाला Google वर असलेली कंटेंट काढून टाकण्याची संधी मिळते. यामध्ये असे कंटेंट समाविष्ट आहेत जे Google च्या धोरणांचे उल्लंघन करणार आहे.
Its Outdated I want to Request a Refresh
या पर्यायात तुम्ही तुमची उपलब्ध माहिती अपडेट करू शकता. गुगल या सर्व रिक्वेस्टचे रिव्ह्यू करते. त्यानंतर रिव्ह्यूच्या आधारे Google तुमची माहिती अपडेट करते.
गुगलचे हे टूल देखील उत्तम आहे.
रिझल्ट्स अबाउट यू टूल वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती ओळखण्याचा आणि हटवण्याचा पर्याय देते. जेव्हा जेव्हा तुमची वैयक्तिक माहिती शोध निकालात दिसेल तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल. गुगलचे नवीन रिझल्ट्स अबाउट यू टूल त्यांच्यासाठी फायदेशीर आहे
