Honda launches new car | नवीन डिझाईन अन् लेटेस्ट टेक्नोलॉजीसह होंडाची ‘ही’ नवी कोरी कार लाँच… काय आहे किंमत
होंडाच्या या नवीन कारमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने राइडर एक प्रीमिअम क्लास कारचा अनुभव घेऊ शकणार आहेत. दरम्यान, ही कार अद्याप नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
होंडाने आपली एक नवीन कार लाँच केली आहे. या ब्रँड न्यू कारचे नाव 2023 होंडा एचआर-व्ही (Honda HR-V 2023) ठेवण्यात आले आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक लेटेस्ट टेक्नोलॉजीला सहभागी करून घेतले आहे. सोबतच यात न्यू डिझाइन आणि पहिल्यापेक्षा चांगली स्पेस देण्यात आली आहे. या नवीन कारमध्ये अनेक नवीन फीचर्सचा (Features) समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने राइडर एक प्रीमिअम क्लास कारचा अनुभव घेउ शकणार आहेत. दरम्यान, ही कार अद्याप नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. दरम्यान, या कारचे स्पेसिफिकेशन्स (Specifications) युरोपमध्ये लाँच करण्यात आलेल्या मॉडेलशी साम्य असलेले आहे. होंडाच्या या नवीन कारला त्याच पार्श्वभूमीवर लाँच करण्यात आले आहे. दरम्यान, या नवीन कारच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये या कारची किंमत USD 23650 म्हणजे सुमारे 18.38 लाख आणि USD 28950 म्हणजे जवळपास 22.51 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये 2023 होंडा एचआर-व्हीला मोठ्या आकारात तयार करण्यात आले आहे. नवीन एचआर-सी 239 एमएम जास्त मोठी आहे.
2023 होंडा एचआर-व्ही फीचर्स
लेटेस्ट कारची बॉडी आणि डिझाईन पाहून सहज अंदाज येता की ही कार जुन्या कारपेक्षा जास्त चांगली आहे. यात बाहेर आलेले बॉडी पॅनल्स, शार्प बॉडी हेडलँपसह डेटाइम रनिंग एलईडी लाइट्स आणि ब्लॅक इंसर्टसह दमदार ग्रील्स देण्यात आले आहे. वळवता येणार एलईडी टेल लाइट्स दिले आहेत. त्याच प्रमाणे स्टॉप लँप देण्यात आले आहेत. सोबतच यात शार्क फिन एंटीना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
हे आहेत ऑप्शनल फीचर्स
2023 होंडा एचआर-व्हीमध्ये ग्राहकांसाठी काही पर्यायी फीचर्सही देण्यात आले आहे. यांची निवड करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे खर्च करावे लागू शकतात. यात, एडब्ल्यूडी सिस्टम देण्यात आली असून, यासाठी 1500 डॉलरचा अधिकचा खर्च करावा लागणार आहे. अन्य फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यात, 9-9 इंचाचे टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहेत. सोबत यात वायरलेस ॲप्पल कार प्ले आणि अँड्रोईड ऑटो कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. दरम्यान, 2023 होंडा एचआर-व्हीच्या परफार्मेंसबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2.0 लीटर फार सिलेंडर नेच्यूरली आस्पेरेटेड इंजिन देण्यात आले आहे. सिविक कारसारखी ही कारदेखील 160 पीएसची पावर आणि 187 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करु शकते. हे सीवीटी ऑटोसोबत कनेक्टेड असतात.