काय सांगता! फक्त ‘इतक्या’ हजारांमध्ये HP चे तगडे फिचर्स असलेले लॅफटॉप बाजारात

| Updated on: Apr 18, 2023 | 8:09 PM

HP कंपनीने नुकतंच त्यांचे नवीन लॅपटॉप मॉडेल लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉपचे नवीन मॉडेल तुमच्या नक्कीच पसंतीस उतरतील, (hp latest laptop) कारण या मॉडेल्सचे फीचर्स एकदम भारी आहेत.

काय सांगता! फक्त इतक्या हजारांमध्ये HP चे तगडे फिचर्स असलेले लॅफटॉप बाजारात
Follow us on

Tech News : जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करायचा प्लॅन करत असाल तर HP कंपनीने नुकतंच त्यांचे नवीन लॅपटॉप मॉडेल लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉपचे नवीन मॉडेल तुमच्या नक्कीच पसंतीस उतरतील, (hp latest laptop) कारण या मॉडेल्सचे फीचर्स एकदम भारी आहेत. तसेच या  मॉडेल्सची किंमत 39 हजार रुपयांपासून सुरू होते जी 81,999 रुपयांपर्यंत आहे.

नवीन लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांसाठी HP ने दोन नवीन लॅपटॉप मॉडेल्स लॉन्च केले आहेत. हे नवीन मॉडेल्स हलक्या वजनासह लाँच केले आहेत कारण तुम्ही ते सहजपणे तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. तर या दोन नवीन HP लॅपटॉप मॉडेल्सबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

नवीन HP लॅपटॉपची किंमत किती आहे?

या नवीन HP लॅपटॉप 15 ची किंमत 39,999 रुपये आहे. हा लॅपटॉप तुम्ही नॅचरल सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करू शकता. तर Pavilionx360  हे मॉडेल तुम्ही 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी करू शकता. पण हे मॉडेल फिकट गुलाबी सोनेरी रंगात उपलब्ध असेल. तसंच HP Pavilion Plus 14 ची किंमत 81,999 रुपये आहे. हा लॅपटॉप तुम्हाला फक्त नॅचरल सिल्व्हर कलरमध्येच मिळेल.

HP 15 मध्ये मिळतील हे फीचर्स

HP 15 डिव्हाइसमध्ये मॉडेल क्रमांक FD0012TU सोबत 15.6-इंचचा डिस्प्ले आहे जो पूर्ण HD रिझोल्यूशन देईल.  तसेच तुम्हाला Intel Core i5-1335U प्रोसेसरचा सपोर्टही मिळेल. या लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 RAM आणि 1TB स्टोरेज आहे.  तर लॅपटॉपच्या समोर व्हिडिओ कॉलिंगसाठी असलेल्या वेबकॅम वाइड व्हिजन 720 पिक्सेल एचडी क्वॉलिटी देतो.

HP Pavilion x360 चे फीचर्स

या लॅपटॉपमधील स्क्रीनचा आकार थोडासा लहान आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ 14-इंचाच्या फुल एचडी डिस्प्लेसह काम करावे लागेल. तसेच यामध्ये इंटेल i5-1335U प्रोसेसरही देण्यात आला आहे.  सोबतच 16GB DDR4 RAM सह 1TB स्टोरेज दिले गेले आहे.

HP Pavilion Plus 14 चे फीचर्स

HP Pavilion Plus 14 मध्ये 12व्या जनरेशनचा इंटेल कोर i3-N305 प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिवाइसमध्ये 14-इंचची स्क्रीन देखील देण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी वेबकॅम 1080p फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह दिले गेले आहे.