Tech जगात Parag Agrawal यांच्यासह दबदबा, टॉप 5 कंपन्यांच्या CEO पदी भारतीय महिला

Twitter (पराग अग्रवाल), Google (सुंदर पिचाई), Microsoft (सत्या नडेला) पासून ते Adobe (शंतनू नारायण) पर्यंत अनेक बड्या टेक कंपन्यांची कमान भारतीयांच्या हातात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सिलिकॉन व्हॅलीतला भारतीयांचा दबदबा वाढतोय, असं म्हणावं लागेल.

Tech जगात Parag Agrawal यांच्यासह दबदबा, टॉप 5 कंपन्यांच्या CEO पदी भारतीय महिला
Anjali Sud, Revathi Advaithi, Priya Lakhani
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 12:17 PM

मुंबई : भारतीय वंशाचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत, सोमवारी संध्याकाळी माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्तीची घोषणा केली. अमेरिकेतील अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांची कमान भारतीयांच्या हाती आहे आणि आता यात पराग अग्रवाल यांचे नावही जोडले गेले आहे. (Indian origin Women successfully Running Tech world in Silicon Valley)

Twitter (पराग अग्रवाल), Google (सुंदर पिचाई), Microsoft (सत्या नडेला) पासून ते Adobe (शंतनू नारायण) पर्यंत अनेक बड्या टेक कंपन्यांची कमान भारतीयांच्या हातात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सिलिकॉन व्हॅलीतला भारतीयांचा दबदबा वाढतोय, असं म्हणावं लागेल. दरम्यान, सिलिकॉन व्हॅलीत जसा सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल आणि शंतनू नारायण यांचा दबदबा आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतल्या अनेक टेक कंपन्यांची धुरा भारतीय महिलांकडेदेखील आहे. पुरुषांप्रमाणेच भारतीय महिलादेखील सिलिकॉन व्हॅलीत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावत आहेत.

1. अंजली सूद (Anjali Sud)

Vimeo च्या CEO अंजली सूद 2014 पासून कंपनीशी संबंधित आहेत. या कंपनीत त्या ग्लोबल मार्केटिंग हेड म्हणून रुजू झाल्या होत्या. 38 वर्षीय अंजली सूद अमेरिकेतील फ्लिंट (मिशिगन) येथे वाढल्या आहेत. त्यांचे आई-वडील अनिवासी भारतीय आहेत. Vimeo Inc. अमेरिकन व्हिडिओ होस्टिंग आणि शेअरिंग कंपनी.

2. रेवती अद्वैती (Revathi Advaithi)

Flex च्या सीईओ रेवती अद्वैती भारतात वाढल्या आहेत. त्या Uber आणि Catalyst.org सारख्या कंपन्यांच्या बोर्डावर इंडीपेंडेंट डायरेक्टर देखील आहेत. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक आणि थंडरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. 55 वर्षांच्या रेवती यांचे वडील ए.एन. स्वामी केमिकल इंजिनिअर होते. भारतात, त्यांच्या कुटुंबाने बिहार, गुजरात, आसाम आणि तामिळनाडू येथे वास्तव्य केले आहे. Flex Ltd. ही यूएस-सिंगापूर-आधारित इलेक्ट्रॉनिक्सची कंत्राटी उत्पादन करणारी कंपनी आहे.

3. जयश्री उल्लाल (Jayshree Ullal)

Arista Networks च्या सीईओ जयश्री उल्लाल यांची 2008 मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याआधी त्यांनी AMD, Fairchild Semiconductor आणि Cisco या कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. तसेच Santa Clara विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. जयश्री, आता 60 वर्षांच्या आहेत, त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला, पण त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे. Arista Networks ही एक अमेरिकन कम्यूटर नेटवर्किंग कंपनी आहे.

4. प्रिया लखानी (Priya Lakhani)

भारतीय वंशाच्या प्रिया लखानी या CENTURY Tech च्या संस्थापक आणि CEO आहेत. ब्रिटन-केंद्रित सेंच्युरी टेक आर्टिफिश‍ियल इंटेलीजेंस आधारित लर्निंग तंत्रज्ञान विकसित करते. यात शिक्षक, न्यूरोसायंटिस्ट आणि तंत्रज्ञांची एक टीम आहे जी शाळा आणि महाविद्यालयांसाठी AI टूल्स विकसित करतात. प्रिया लखानी यांनी मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग लॉमध्ये एलएलएम केले आहे. याशिवाय त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून मीडिया लॉमध्ये लॉ आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. त्यांनी लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून कायदा आणि अर्थशास्त्रात बीए केले आहे.

5. नीता माधव (Nita Madhav)

Metabiota च्या CEO नीता माधव या देखील भारतीय वंशाच्या अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. Metabiota जगभरातील संसर्गजन्य रोगांमुळे लोकांचे आरोग्य आणि आर्थिक जोखीम कमी करण्यात सरकार आणि व्यवसायांना मदत करते. कंपनी डेटा सायन्स, अॅनालिटिकल टूल्स इत्यादीद्वारे हे काम करते. नीता माधव यांनी Yale विद्यापीठातून इकोलॉजी आणि इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये पदवी घेतली आहे आणि Emory विद्यापीठातून पब्लिक हेल्थ या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

इतर बातम्या

Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत

(Indian origin Women successfully Running Tech world in Silicon Valley)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.