व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स स्मॅप मेसेज करणार ब्लॉक, आणखी काय आहे फायदे
whatsapp new features: स्पॅम खाती मेमरी भरणारे मेसेज मोठ्या प्रमाणावर पाठवतात. स्पॅम खाती ब्लॉक केल्याने व्हॉट्सअॅप प्रोसेसिंग डेटाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. हे वैशिष्ट्य युजरची गोपनीयता सुनिश्चित करेल. तसेच हानिकारक सॉफ्टवेअरला प्रतिबंध करेल.
whatsapp new features: व्हॉट्सअॅप स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची गरज झाली आहे. या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींचा घरात आहे. व्हॉट्सअॅपची मुख्य कंपनी मेटाकडून वेळोवेळी युजरच्या दृष्टीकोनातून नवनवीन फीचर्स ॲड केले जातात. व्हॉट्सअॅपने नुकताच दिलेल्या अपडेटमध्ये अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज ब्लॉक करण्याची सुविधा देणार आहे. हे फिचर्स सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. ते लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. हे अपडेट अँड्रॉइड बीटा 2.24.17.24 व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे.
काय होणार फायदा
नवीन फीचरमुळे व्हॉट्सअॅप अकाउंटची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी आणखी सुधारेल असा विश्वास आहे. या फीचरद्वारे आयपी ॲड्रेस प्रोटेक्शन, लिंक प्रिव्ह्यू ब्लॉक असे पर्याय मिळणार आहे. या फिचर्समुळे धोकादायक मेसेजपासून संरक्षण मिळणार आहे. या फिचर्समध्ये WhatsApp अनोळखी नंबरवरून येणारे संदेश स्वत:हून ब्लॉक करेल. जेव्हा स्पॅम संदेशांची संख्या एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा हे फिचर्स ते मेसेज ब्लॉक करेल.
इन्स्टाग्रामवर लाईकचा पर्याय?
स्पॅम आणि अनावश्यक संदेश कमी करून युजरला अधिक चांगला अनुभव देण्याचा व्हॉट्सअॅपचा उद्देश आहे. कारण या मेसजचा परिणाम स्मार्टफोनच्या मेमरी आणि प्रोसेसरवर होतो. स्पॅम खाती मेमरी भरणारे मेसेज मोठ्या प्रमाणावर पाठवतात. स्पॅम खाती ब्लॉक केल्याने व्हॉट्सअॅप प्रोसेसिंग डेटाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. हे वैशिष्ट्य युजरची गोपनीयता सुनिश्चित करेल. तसेच हानिकारक सॉफ्टवेअरला प्रतिबंध करेल.
या फीचरमुळे फिशिंगचे धोकेही कमी होतील, असा विश्वास आहे. दरम्यान, मेटा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम सारख्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपडेटला ‘लाइक’ करण्याचा पर्याय आणण्याची योजना आखत आहे.
हे नवीन फीचर्स सुरु
व्हॉट्सअॅपने आणखी एक नवीन फीचर्स सुरु केले आहे. तुम्ही काही लोकांपासून व्हॉट्सअॅप स्टेट्स लपवू इच्छीत असाल तर तसे तुम्हाला करता येणार आहे. सेटींगमध्ये जाऊन काही बदल केल्यानंतर हे करता येते. सेटींगमध्ये गेल्यावर Account वर क्लिक करा. त्यानंतर Privacy वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Status पर्याय दिसेल. त्यात तीन पर्याय दिसतील. My Contact, My Contacts Except आणि Only Share With जर तुम्ही My Contact पर्याय निवडला तर ज्या लोकांना स्टेट्स दाखवू इच्छित नाही, त्यांचे नंबर निवडून डन करावे लागले.