5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स
तुम्हाला विश्वास नाही होणार पण 5,000 पेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन्स बाजारात चांगल्या ऑफरसह विकले जात आहेत. यामध्ये 4 टेक्नोलॉजीही देण्यात आली आहे.
मुंबई : सध्याच्या या डिजिटल वर्ल्डमध्ये स्मार्टफोन कंपन्यांची एकमेकांशी जोरदार स्पर्धा सुरू आहे. यामुळे आता सगळ्याच कंपन्या स्वस्त किंमतीत मोबाईल फोन विकत आहेत. यावर मोठ मोठ्या ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. तुम्हाला विश्वास नाही होणार पण 5,000 पेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन्स बाजारात चांगल्या ऑफरसह विकले जात आहेत. यामध्ये 4 टेक्नोलॉजीही देण्यात आली आहे. (mobile price budget smartphones samsung nokia price less than 5000 with great features)
फक्त 5 हजारांच्या बजेटमध्ये पॅनासॉनिक, सॅमसंग (Samsung) आणि नोकिया (Nokia) सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीने फोन लॉन्चिंगपासूनच किंमती कमी करण्यास सुरुवात केली आगे. या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत आणि त्या विकत घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील हे जाणून घ्या …
सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर
भारतातील ग्राहकांना सॅमसंगने गॅलेक्सी Galaxy M01 Core परवडणारा आहे. यामध्ये 5.3 इंचाची HD+ डिस्प्ले आहे. हा फोन ब्लॅक, निळा आणि लाल रंगात मिळेल. फोनमध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये कंपनीने 11 तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावाही केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा क्वाडकोर 6739 प्रोसेसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी M01 कोअरमध्ये फ्लॅश लाईटसह 8-मेगापिक्सलचा मागील कॅमेरा, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा, 1 जीबी रॅम + 16 जीबी रॅम देण्यात आलं असून या फोनची किंमत 4,669 रुपये आहे.
नोकिया 1
नोकिया 1 फोनमध्ये 4.5 इंचाचा IPS LCD स्क्रीन, पिक्सल डेन्सिटी 218 पिक्सेल देण्यात आलं असून या स्मार्टफोनमध्ये 1.1 GHz Quad कोर प्रोसेसरसह आहे. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल, 5 मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणाऱ्या या फोनची किंमत 4,672 रुपये आहे.
पॅनासोनिक एलुगा i7
हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे जो अँड्रॉइड 7.0 वर चालतो. फोनचा डिस्प्ले 5.45 इंचाचा, एलईडी फ्लॅश, ऑटोफोकससह 8-मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा, फोनचा सेल्फी कॅमेरा देखील 8 मेगापिक्सल, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरीची देण्यात आली असून याची किंमत फक्त 5 हजार रुपये आहे.
मायक्रोमॅक्स भारत 2 प्लस
मायक्रोमॅक्स भारत 2 प्लस स्मार्टफोनची किंमत फक्त 3,300 रुपये आहे. यामध्ये 4 इंचाचा डिस्प्ले, 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनला 1 जीबी रॅम आणि 8 जीबी अंतर्गत स्टोरेज मिळेल. (mobile price budget smartphones samsung nokia price less than 5000 with great features)
संबंधित बातम्या –
Realme Narzo 30 सिरीज 24 फेब्रुवारीला बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
आता WhatsApp ला करावे लागणार नाही डिलीट; लवकरच येणार जबरदस्त फीचर्स
अँड्रॉईडच्या या नवीन फिचरमधून आता अॅप्स शेअर करता येणार
(mobile price budget smartphones samsung nokia price less than 5000 with great features)