लाँचिंगआधीच Moto G71 5G ची किंमत लीक, नवीन स्मार्टफोन 10 जानेवारीला बाजारात

Motorola कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 5G लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की हा स्मार्टफोन भारतात 10 जानेवारी रोजी लॉन्च केला जाईल.

लाँचिंगआधीच Moto G71 5G ची किंमत लीक, नवीन स्मार्टफोन 10 जानेवारीला बाजारात
Moto G71 5G
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:44 PM

मुंबई : Motorola कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 5G लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की हा स्मार्टफोन भारतात 10 जानेवारी रोजी लॉन्च केला जाईल. याशिवाय, आगामी स्मार्टफोन Moto G71 5G चे एक सपोर्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर जारी केले जाईल, ज्यामध्ये फोटो, डिझाइन आणि अनेक फीचर्सबाबतची माहिती जाहीर केली जाईल. (Moto G71 5G price and features leaked ahead of its launching)

Moto G71 हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 सह लाँच केला जाऊ शकतो. Moto G71 युरोपमध्ये 299.99 युरो (जवळपास 25,200 रुपये) किंमतीसह लाँच करण्यात आला. चीनी बाजारात, स्मार्टफोनची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी 1,699 (जवळपास 20,000 रुपये) होती. दरम्यान, एका टिपस्टरने या भारतात लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला आहेत. टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरवर आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये G71 ची किंमत उघड केली आहे. अभिषेकच्या लेटेस्ट पोस्टमध्ये, स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय, त्याने म्हटले आहे की, G71 केवळ फ्लिपकार्टवरुनच विकला जाईल.

मोटोरोला भारतात एकापाठोपाठ एक नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे. Moto G31 आणि Moto G51 लाँच केल्यानंतर, Motorola कंपनी लवकरच Moto G71 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच करू शकते. लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने जागतिक बाजारात एकूण पाच स्मार्टफोन लॉन्च केले होते. भारतात आतापर्यंत पाचपैकी फक्त दोनच स्मार्टफोन्सचे अनावरण झाले आहेत.

Moto G71 चे संभाव्य स्पेक्स

हा स्मार्टफोन आधीच वेगवेगळ्या बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन्स माहिती आहेत. Moto G71 मध्ये 6.4-इंचांचा फुल-HD+ OLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. डिस्प्ले 60hz च्या स्टँडर्ड रिफ्रेश रेटसह येतो. Moto G71 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह सुसज्ज आहे. यात 8GB RAM आणि 128GB एक्सपेंडेबल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसांठी याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Moto G71 5G price and features leaked ahead of its launching)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.