5000 mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह Oppo A95 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शानदार फीचर्ससह चीनी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A95 लॉन्च करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये येतो, परंतु त्यात हाय रिफ्रेश-रेट डिस्प्ले किंवा 5G सारख्या फीचर्सची कमी आहे.

5000 mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह Oppo A95 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oppo A95 Smartphone
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:51 PM

मुंबई : शानदार फीचर्ससह चीनी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A95 लॉन्च करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये येतो, परंतु त्यात हाय रिफ्रेश-रेट डिस्प्ले किंवा 5G सारख्या फीचर्सची कमी आहे. (Oppo A95 launches with Snapdragon 662 and 5,000 mAh battery)

Oppo च्या पोर्टफोलिओमधील A सिरीज स्मार्टफोन्स अनेकदा चांगल्या फीचर्ससह येतात. कंपनीने अलीकडेच दिवाळीपूर्वी भारतात A55 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo A95 हा A55 सारखा 4G फोन आहे. तथापि, A95 Qualcomm प्रोसेसरसह येतो, हा त्यातला प्रमुख फरक आहे कारण A55 मध्ये MediaTek प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Oppo A95 स्पेसिफिकेशन

Oppo A95 हा एक मिड रेंज फोन आहे जो 8GB RAM आणि 128GB इंटर्नल मेमरीसह octa-core Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसरसह येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनची स्टोरेज स्पेस वाढवता येईल. हा प्रोसेसर सामान्य वापरासाठी पुरेसा आहे. फोन Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो आणि अद्याप Android 12 अपडेटबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. Oppo A95 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.43 इंचाचा फुल-एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. डिस्प्लेवर पंच-होल कटआउट आहे आणि त्याच्या आत 16 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सेल सेन्सर, 2 मेगापिक्सेल बोकेह सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅशही आहे. Oppo A95 5000mAh बॅटरी पॅकसह येतो, तसेच 33W VOOC फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. फोन चार्ज करण्यासाठी USB-C पोर्ट आहे, तसेच यात 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळेल. फोनची जाडी 7.95mm आणि वजन 175 ग्रॅम आहे.

Oppo A95 ची किंमत

सध्या Oppo A95 मलेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ता तो भारतात खरेदी करू शकत नाही, पण Oppo लवकरच हा फोन भारतीय बाजारात लाँच करेल अशी शक्यता आहे.

8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह Oppo A95 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत MYR 1,099 (अंदाजे 19,600 रुपये) आहे. फोन Starry Black आणि Rainbow Silver रंगांमध्ये येतो. हा फोन सध्या मलेशियामधील ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सद्वारे उपलब्ध असेल परंतु तो भारतीय बाजारपेठेत कधी पोहोचेल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Oppo A95 launches with Snapdragon 662 and 5,000 mAh battery)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.