Anniversary Sale : स्वस्तात Realme स्मार्टफोन खरेदीची संधी, कंपनीकडून 17000 रुपयांची सूट

रियलमी (Realme) कंपनीने Anniversary सेल ची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन आणि AIOT उत्पादनांवर सूट मिळणार आहे.

Anniversary Sale : स्वस्तात Realme स्मार्टफोन खरेदीची संधी, कंपनीकडून 17000 रुपयांची सूट
Realme Narzo 30 Pro 5g
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 5:10 PM

मुंबई : रियलमी (Realme) कंपनीने Anniversary सेल ची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोन आणि AIOT उत्पादनांवर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉमवर यापूर्वीच ही विक्री सुरू झाली आहे. त्याचबरोबर, दोन्ही रिटेल प्लॅटफॉर्मवर ही विक्री 8 जूनपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बर्‍याच स्मार्टफोन्सवर सूट मिळू शकते. (Realme Anniversary Sale 2021 : Discounts of up to 17,000 rupees on smartphones, smartwatch, earphones)

त्याचबरोबर रियलमी कंपनी येथे बँक ऑफरदेखील देत आहे, त्यामध्ये सिटीबँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के त्वरित सूट मिळणार आहे. दुसरीकडे, जर युजरने 20 हजार रुपयांहून अधिक खरेदी केली तर त्याला 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. रियलमी एक्स 50 प्रो 5 जी वर ग्राहकांना 17,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, तर त्यांना रियलमी X3 सुपर झूमवर 6000 रुपयांची सूट मिळू शकते. दुसरीकडे, त्यांना रियलमी एक्स 7 प्रो 5 जी वर 3000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तर Realme X7 5G हा स्मार्टफोन 2000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल.

कंपनी इतर स्मार्टफोन्सवरही सूट देत आहे, ज्यामध्ये रियलमी नार्झो 30 प्रो 5जी, रियलमी नार्झो 30A, नार्झो 20, नार्झो 20 प्रो, रियलमी 8, रियलमी 8 प्रो, रियलमी 8 5 जी या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यासह तुम्ही रियलमी बड्स एयर प्रो, रियलमी स्मार्टवॉच S, रियलमी स्मार्टवॉच S प्रो, रियलमी पावरबँक, रियलमी बड्स वायरलेस, रियलमी ईटूथब्रश, रियलमी स्मार्ट प्लग आणि इतर प्रोडक्ट्सवर सूट मिळवू शकता.

या स्मार्टफोन्सवरही सूट

रियलमी X3 सुपर झूम या स्मार्टफोनवर 6000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. तर रियलमी X7 प्रो 5जी वर 3000 रुपयांचा डिस्काउंट आहे. ग्राहक रियलमी X7 5G 2000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करु शकतात. सेलमध्ये रियलमी नार्झो 30 प्रो 8 जीबी आणि 128 स्टोरेज व्हेरिएंटवर 2000 रुपयांचा डिस्काउंट आहे. तर रियलमी नार्झो 30 प्रो च्या 6 जीबी आणि 64 जीबी स्टोरेजवरही सूट देण्यात आली आहे.

या प्रोडक्ट्सवर सर्वात कमी डिस्काऊंट

सर्वात कमी डिस्काउंट ज्या स्मार्टफोन्सवर देण्यात आला आहे, त्यामध्ये रियलमी 8, रियलमी 8 5 जी, रियलमी 8 प्रो या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सवर 500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. रियलमी वॉच S 1000 रुपयांच्या प्रीपेड ऑफरसह सादर करण्यात आले आहे. रियलमी स्मार्टवॉच S प्रो वर 2000 रुपयांची सूट आहे. तर बड्स एयर प्रो तुम्ही 500 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme Anniversary Sale 2021 : Discounts of up to 17,000 rupees on smartphones, smartwatch, earphones)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.