AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reliance Jio ची धमाकेदार ऑफर! या रिचार्जवर मिळणार 700 रुपयांचा फायदा

Reliance Jio offer: जिओने आठ वर्षांत ४९ कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे. आता जगातील मोबाइल ट्रॅफीकचे 8% वाटा जिओचा आहे. तसेच जिओ नेटवर्कवरील प्रत्येक युजर मासिक 30 GB डेटा वापरत आहे. भारताचा विचार केल्यावर जिओचा भारतातील डेटा ट्रॅफिकमध्ये 60% वाटा आहे.

Reliance Jio ची धमाकेदार ऑफर! या रिचार्जवर मिळणार 700 रुपयांचा फायदा
| Updated on: Sep 07, 2024 | 10:48 AM
Share

Reliance Jio offer: रिलायन्स जिओने आठव्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओच्या काही रिचार्जवर 700 रुपयांपर्यंत फायदा यामुळे मिळणार आहे. ही संधी केवळ 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान आहे. या काळात काही त्रैमासिक आणि वार्षिक प्लॅन रिचार्ज करून 700 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. कंपनीच्या वेबसाइट jio.com वर ही माहिती देण्यात आली आहे.

कोणत्या रिचार्जवर मिळणार फायदा

899 रुपये, 999 रुपये आणि 3599 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 700 रुपयापर्यंत फायदा मिळणार आहे. 899 रुपये आणि 999 रुपये प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा मिळतो. त्याची मुदत अनुक्रमे 90 आणि 98 दिवस असते. तसेच 3,599 रुपयांचा प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटीसोबत 2.5 GB डेटा मिळतो.

जिओ त्यांच्या 3 महिने आणि 12 महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनवर 28 दिवसांच्या वैधतेसाठी 10 OTT ॲप्स मोफत देत आहे. तसेच 10 GB डेटा वाउचर मिळणार आहे. यामुळे 175 रुपयांचा फायदा होणार आहे. या यादीमध्ये SonyLIV, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lankha, Planet Marathi, Chaupal, Hoichoi आणि JioTV यांचा समावेश आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी 10GB पर्यंत हाय-स्पीड 4G डेटा देखील ऑफर करत आहे.

हे ही फायदे मिळणार

  • जोमॅटो गोल्ड मेंबरशिप: तीन महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे.
  • आजियो वाउचर: 2999 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खरदेवर 500 रुपयांची सुट मिळणार आहे.

जिओने आठ वर्षांत ४९ कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे. आता जगातील मोबाइल ट्रॅफीकचे 8% वाटा जिओचा आहे. तसेच जिओ नेटवर्कवरील प्रत्येक युजर मासिक 30 GB डेटा वापरत आहे. भारताचा विचार केल्यावर जिओचा भारतातील डेटा ट्रॅफिकमध्ये 60% वाटा आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, जिओचे पुढील 3-4 वर्षांत उत्पन्न आणि नफा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, देशाची डिजिटल क्षमता आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात जिओ महत्त्वाची भूमिका बजावत राहील.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.