सॅमसंगच्या टीव्हीवर Free मिळणार स्मार्टफोन आणि साऊंडबार, धमाकेदार आहेत ऑफर्स
या सेलची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे देशातील कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही या सेलमध्ये सहभागी होऊ शकता आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता.
मुंबई : सॅमसंगने त्यांच्या सगळ्यात मोठ्या टीव्ही डेज सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तुम्हाला तब्बल 55 इंच किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचा टीव्ही मिळणार आहे. या सेलची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे देशातील कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही या सेलमध्ये सहभागी होऊ शकता आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. कंपनीने जाहीर केलेल्यानुसार ही ऑफर 31 जानेवारी 2021 पर्यंतच वैध असणार आहे. यामध्ये खास ऑफर आणि डिस्काऊंटही देण्यात आलं आहे. ज्यामध्ये मोफक स्मार्टफोनचीही ऑफर आहे. (samsung big tv days sale get galaxy smartphones soundbars free in sale)
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग मोठी स्क्रीन असलेल्या टीव्हीवर म्हणजेच 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 82 इंच, 85 इंच आणि QLED टीव्ही, क्रिस्टल 4 के यूएचडी (4K UHD), क्यूएलईडी 8 के (QLED 8K) टीव्हीवर धमाकेदार सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांसाठी ही खास संधी असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी 65 इंचच्या QLED टीव्हीवर आणि 75 इंचच्या क्रिस्टल 4K UHD टीव्हीवर 22,999 रुपयांचा गॅलेक्सी A51 स्मार्टफोनसुद्धा देत आहे. तर 55 इंच QLED टीव्ही आणि 65 इंचच्या 4K UDH टीव्हीवर गॅलेक्सी ए31 देण्यात येत आहेत ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. या सगळ्यात जर तुम्ही 75 इंच, 82 इंच आणि 85 इंचचा QLED टीव्ही विकत घेतला तर यामध्ये तुम्हाला HW-Q800T साऊंडबार मिळेल ज्याची किंमत 48,990 रुपये आहे.
मोफत मिळेल साऊंडबार
या खास सेलमध्ये आणखी काही डिस्काऊंटबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 20 टक्के कॅशबॅकही मिळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेलमध्ये 1990 रुपयांची ईएमआय सुविधासुद्धा उपलब्ध आहे. खरंतर, 2020 मध्ये कोरोना आणि लॉकडाऊनच्या कठीण काळात मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने हा खास सेल ठेवला आहे.
शहरं असो किंवा खेड्यात हळूहळू टीव्हीची मागणी वाढत आहे. इथल्या ग्राहकांना मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोठा टीव्ही खरेदी करायचा आहे. जेणेकरुन त्यांना घरबसल्या सिनेमा पाहता येईल. अशा परिस्थितीत, सणासुदीच्या काळात बऱ्याच कंपन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या खास सेलमधून इलेक्ट्रोनिक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगला नफा होणार आहे. (samsung big tv days sale get galaxy smartphones soundbars free in sale)
संबंधित बातम्या –
Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?
108MP कॅमेरा आणि शानदार फिचर्स असलेला Xiaomi चा स्मार्टफोन उद्या लाँच होणार, किंमत फक्त…
(samsung big tv days sale get galaxy smartphones soundbars free in sale)