Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electrinics) बाजारात उत्तम कामगिरी केली आहे. वास्तविक दक्षिण कोरियन कंपनीने जागतिक स्मार्टफोन बाजारात पहिले स्थान मिळवले आहे.
मुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electrinics) बाजारात उत्तम कामगिरी केली आहे. वास्तविक दक्षिण कोरियन कंपनीने जागतिक स्मार्टफोन बाजारात पहिले स्थान मिळवले आहे. कंपनीने या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रमी नोंद केली आहे. ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म कॅनालिसने (Canalys) ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, सॅमसंग 23 टक्के मार्केट शेअरसह पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या विक्रीचा दर वाढलेला नाही. (Samsung electronics stays on first rank in global smartphone market, Canalys report)
कॅनालिसच्या अहवालानुसार, Apple कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे आणि गेल्या वर्षी देखील दुसऱ्या तिमाहीत, हा ब्रँड दुसऱ्या स्थानावरच होता. Apple चा बाजारातील हिस्सा वाढला असला तरी, जिथे गेल्या वर्षी Apple ची बाजारातील हिस्सेदारी 12 टक्के होती आणि आता या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 15 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीदेखील ही कंपनी दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
Xiaomi तिसऱ्या, Vivo चौथ्या स्थानी कायम
Canalys अहवालात, शाओमी कंपनीला जागतिक बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. मात्र शाओमीचा बाजार हिस्सा गेल्या वर्षीसारखाच राहिला आहे. त्याचबरोबर, विवो या यादीत चौथ्या स्थानावर आहे, या कंपनीची बाजारातील हिस्सेदारी या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 10 टक्के आहे आणि गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा आकडा 9 टक्के होता.
Oppo पाचव्या क्रमांकावर
या श्रेणीमध्ये ओप्पोला पाचवे स्थान मिळाले आहे, या कंपनीचा जागतिक स्मार्टफोन बाजारात 10 टक्के वाटा आहे. तर गेल्या वर्षी या कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 9 टक्के इतकी होती.
Samsung ची विक्री जैसे थे
सॅमसंग भारतातील चीनी कंपनी Xiaomi, Realme, Oppo आणि OnePlus सारख्या ब्रँडला स्पर्धा देत आहे. पण सॅमसंगचा बाजार हिस्सा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेला नाही. सॅमसंगचा मागच्या वर्षीही 23 टक्के बाजार हिस्सा होता, तर या वर्षी देखील सॅमसंगचा बाजार हिस्सा वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 23 टक्के इतकाच कायम आहे.
स्मार्टफोन ब्रँड | 2021 च्या तिसऱ्या तिमाहीतील विक्री | 2020 च्या तिसऱ्या तिमाहीतील विक्री |
Samsung | 23% | 23% |
Apple | 15% | 12% |
Xiaomi | 14% | 14% |
Vivo | 10% | 9% |
Oppo | 10% | 9% |
इतर बातम्या
12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…
Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
(Samsung electronics stays on first rank in global smartphone market, Canalys report)