Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनची किंमत समजल्यावर कराल लगेच बुक, जबरदस्त ऑफरचा घ्या लाभ

तुम्ही आता अगदी कमी बजेटमध्ये असलेला मागील वर्षीचा टॉप मॉडेल Samsung Galaxy S24 Ultra खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे यावेळी तुम्ही गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनची किंमत समजल्यावर कराल लगेच बुक, जबरदस्त ऑफरचा घ्या लाभ
Samsung Galaxy S24 Ultra Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 27, 2025 | 4:21 PM

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच भारतातील नामांकित मोबाईल कंपन्यांपैकी सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस 25अल्ट्रा भारतात लाँच केला आहे, या स्मार्टफोनमधील 256 जीबी व्हेरियंट असलेल्या फोनची किंमत 1,29,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही कंपनीच्या अधिकृत किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे बुक करून ऑर्डर करू शकता.

दरम्यान सॅमसंग कंपनीने ग्राहकांसाठी Samsung Galaxy S24 Ultra या स्मार्टफोनवर नवीन ऑफर दिली आहे. तुम्हाला देखील तुमच्या बजेटमध्ये मागील वर्षीचा टॉप मॉडेल गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा खरेदी करायचा असल्यास या जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊन फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy S24 Ultra या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतील. विशेष म्हणजे यावेळी तुम्ही गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. चला तर मग या फोनची किंमत जाणून घेऊयात.

Samsung Galaxy S24 Ultra 5जी ऑफर

फ्लिपकार्टच्या प्रजासत्ताक दिन सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra या स्मार्टफोनची टायटॅनियम ब्लॅक रंग असलेला २५६ जीबी व्हेरियंटची किंमत 1,21,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट या फोनवर जबरदस्त एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुम्ही तुमचा जुना आयफोन 14 प्रो मॅक्स एक्सचेंज केला तर तुम्ही 53,200 रुपयांपर्यंत बचत करू शकता, ज्यामुळे फोनची किंमत 68,799 रुपये होईल. यात तुम्ही आयफोन व्यतिरिक्त दुसरा फोन देखील एक्सचेंज करू शकता. फोनचे डिटेल्स टाकून एक्सचेंज व्हॅल्यू तपासावी लागेल. तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही दिलेल्या फोनची स्थिती काय आहे आणि मॉडेलवर देखील एक्सचेंज व्हॅल्यू अवलंबून असते.

बँक ऑफर्स

फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 12,000 रुपयांची सूट देखील मिळू शकते. यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. हा फोन तुम्ही 56,799 रुपयांना खरेदी करू शकाल, हा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप चांगली डील आहे.

Samsung Galaxy S24 Ultra 5G स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24 Ultra या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.8 इंचाचा डायनॅमिक एलटीपीओ एमोलेड 2 एक्स डिस्प्ले आहे ज्याचा 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2600 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1440 बाय 3120 पिक्सल रिझोल्यूशन आहे, जो कॉर्निंग गोरिल्ला आर्मरद्वारे संरक्षित आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामुळे हा फोनचा परफॉर्मन्स चांगला असणार आहेआहे. यात 12GB रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसपोर्ट आहे.

क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सलचा मेन सेन्सर, 5x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे, जो फोटोग्राफीसाठी चांगला आहे. हा फोन 8के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 एमएएच ची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि 4.5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसमध्ये टायटॅनियम फ्रेम आहे जी IP68 रेटिंगसह येते.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....