काय सांगता! स्कोडा फक्त आठ लाखांत लाँच, तेही 25 सुरक्षा फीचर्ससह

स्कोडा इंडियाने नवीन 'स्कोडा कायलाक' एसयूव्ही लाँच केली आहे, जी अतिशय बजेटफ्रेंडली कार आहे. ही आकर्षक दिसणारी कार 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉंच करण्यात आली आहे. पाहा नक्की या बजेटफ्रेंडली कारचे फीचर्ससह काय आहेत ते.

काय सांगता! स्कोडा फक्त आठ लाखांत लाँच, तेही 25 सुरक्षा फीचर्ससह
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 6:20 PM

नवीन वर्षात तुम्ही जर नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तेही सुरक्षित फीचर्ससह तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि सुरक्षित फीचर्ससह अशी एक कार घेऊ शकणार आहात. ती म्हणजे स्कोडा. हो स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन ‘स्कोडा कायलाक’ लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 7.89 लाख असणार आहे.

बजेटफ्रेंडली कार

ही कार दिसायलाही फारच आकर्षक आहे. ‘स्कोडा कायलाक’ ही नवीन कार 2 डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 27 जानेवारी 2025 पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल. स्कोडा कायलाक MQB-IN प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. तसेच फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करण्यात आली आहे. आता स्कोडा कायलाक एक इलेक्ट्रिक सनरूफ, ४४६ लीटर बूट स्पेस देते. त्यात 17 इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील आहेत आणि त्यामुळे गाडीच्या प्रीमियम लूकमध्ये अधिक भर पडते.

स्कोडा ऑटोने केली कायलाक लाँच

स्कोडा ऑटोने कायलाक लाँच केली आहे. स्कोडा ने कायलाक प्रथमच सब-4 मीटर SUV सेग्मेंटमध्ये प्रवेश केला आहे. स्कोडा लाइनअपमधील ही सर्वांत परवडणारी एसयूव्ही आहे आणि ती फक्त पेट्रोलवर उपलब्ध असणारी गाडी असणार आहे. गाडीला 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन अशा पर्यायांमध्ये ती उपलब्ध आहे. स्कोडा कायलाक कुशाक आणि स्लाव्हियाप्रमाणे 114 बीएचपी आणि 178 एनएम टॉर्कचे आउटपुट देते. टर्बो पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्स्मिशनशी जोडलेले आहे.

स्कोडा कायलाकचे 25 सुरक्षा फीचर्स

स्कोडा कायलाक मध्ये 10 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आठ इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्ही सहा पद्धतीने इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकणार आहात…

स्कोडा कायलाकमध्ये सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन व स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ब्रेक डिस्क वायपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेग्युलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरन्शियल लॉक, पॅसेंजर एअरबॅगसह एक्टिव्हेशन, मल्टी कोलिजन ब्रेकिंग, ISOFIX सीट्स अशा प्रकारे 25 सुरक्षा फीचर्स आहेत त्यामुळे नक्कीच ही कार सुरक्षेच्या दृष्टीनेही तेवढीच महत्त्वाची ठरत आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.