घरातील कोणत्याही कोपऱ्यात घेऊन जा.. हा Portable आणि कॉम्पॅक्ट AC

वाढलेल्या उन्हामुळे जिवाची लाही लाही होत आहे, अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी एसी, कूलर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. बरेच लोक आपल्या घरात खिडक्यांना मोठा किंवा स्प्लिट एसी देखील लावतात, ज्यामुळे घराची भिंतच फोडावी लागते किंवा खिडक्यांमध्ये जागा बनवावी लागते. पण, आज आम्ही तुम्हाला पोर्टेबल एसीबद्दल सांगणार आहोत. तुम्ही पोर्टेबल एसी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात नेऊ शकता. बाजारात असे पोर्टेबल एसी उपलब्ध आहेत, जे सहज तुम्हाला थंड हवा देतील. अशा एसीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

घरातील कोणत्याही कोपऱ्यात घेऊन जा.. हा Portable आणि कॉम्पॅक्ट AC
Portable A C
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 2:23 PM

मुंबई : वाढत्या तापमानात घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी पोर्टेबल एसी (Portable ac) चा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, हा छोटासा एसी घरातील कुठल्याही कोपऱयात हलवता येत असल्याने, वापरण्यास सोयीस्कर आणि किंमतीनेही सर्वसामान्यांच्या बजेट (Budget) मध्ये आहे. जे लोक भाड्याच्या घरात राहतात, किंवा विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी पोर्टेबल एसी हा सोयीस्कर पर्याय असू शकतो. कारण यासाठी तुम्हाला कुठेही तोडफोड करण्याची गरज नाही. तुमचे बजेट घरभर एसी बसवण्याचे नसेल तर, तुम्ही पोर्टेबल एसी खरेदी करू शकता. घरी पाहुणे आले तर, लीव्हींग रूममध्ये (Living room) आणि झोपतांना बेडरूममध्ये हा पोर्टेबल एसी घेऊन जाऊ शकतात.

  1. पोर्टेबल एसीचे फायदे : पोर्टेबल एसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो बसवण्यासाठी घरात किंवा घराबाहेर मोठा कॉम्प्रेसर बॉक्स बसवावा लागत नाही. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी हा एसी खूप उपयुक्त ठरू शकतो.
  2. ब्लू स्टार 1 टन पोर्टेबल एसी : ब्लू स्टार पोर्टेबल एसी उपलब्ध आहे आणि त्याची किंमत अमाझॅन (Amazon) वर 29990 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवरील माहितीनुसार, या एसीमध्ये क्विक कूलिंग सिस्टम आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियलसाठी चांदीचा वर्क बसवला आहे. यात ऑटो मोड सिस्टीमची सुविधा देखील आहे.
  3. हेरीअर व्हरीटीकूल 2 टन एसी : ( Haier VertiCool 2 Ton ac) – हा एसी घराच्या कोणत्याही खोलीत आणि खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येतो. हा वायफाय सपोर्ट असलेला कॉपर एसी आहे. क्रोम नामक वेबसाइटवर दिलेल्या सूचीमध्ये त्याची किंमत 79990 रुपये आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा एसी 180 स्क्वेमअर फूट क्षेत्रफळ व्यापतो.
  4. मार्क क्यू फ्लिपकार्ट 1 टन पोर्टेबल एसी : फ्लिपकार्टवर मार्क क्यू नावाचा पोर्टेबल एसी देखील आहे आणि त्याची किंमत 21490 रुपये आहे. हा ब्रँड फ्लिपकार्टचा आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा एसी 1 टनाचा आहे. यात ऑटो रीस्टार्टचा पर्याय आहे, ज्यामुळे पॉवर परत आल्यानंतर जुन्या सेटिंग्जवर ते स्वयंचलितपणे चालू होते. यात स्लीप मोड देखील समाविष्ट आहेत, जे झोपेच्या वेळी तापमान स्वयंचलितपणे नियंत्रित करतात.

संबंधित बातम्या :

New smartphones | मोबाईल घ्यायचायं? थोड थांबा या कंपनीचे तब्बल तीन स्मार्टफोन ‘ऑन द वे’

Koo Self-Verification Feature लाँच, युजर्स स्वतःच मिळवू शकणार ग्रीन टिक

Motorola Phones: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह मोटोरोलाचा नवीन फोन लाँचिंगसाठी सज्ज

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.