नेक्सॉननंतर टाटा मोटर्स लवकरच लाँच करणार अल्ट्रोजचे इलेक्ट्रिक व्हर्जन, सिंगल चार्जवर 300 किमीची रेंज
अपकमिंग कारचे नाव टाटा अल्ट्रोज ईव्ही असणार आहे. यात अनेक प्रकारचे प्रीमिअम इक्वीपमेंट दिसून येणार आहेत. नुकतेच टाटाने आपली दोन कॉन्सेप्ट ईव्हीची माहिती जाहीर केली होती. या नवीन कारचे नाव कर्व ईव्ही आणि एविनिया असे आहे. या कार्सला 2024-2025 च्या दरम्यान बाजारात आणले जाणार आहे.
मुंबई : भारतीय ऑटोमोबाइल (Automobile) बाजारात ईव्ही सेगमेंटमध्ये (EV segment) टाटा मोटर्सचा दबदबा पहिल्यापासूनच कायम आहे. आता टाटा मोटर्स आपली आणखी एक ईव्ही सेगमेंटमधील कार लवकरच लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. या अपकमिंग कारचे नाव टाटा अल्ट्रोज ईव्ही असणार आहे. यात अनेक प्रकारचे प्रीमिअम इक्वीपमेंट दिसून येणार आहेत. नुकतेच टाटाने आपली दोन कॉन्सेप्ट ईव्हीची माहिती जाहिर केली होती. या नवीन कारचे नाव कर्व ईव्ही आणि एविनिया असे आहे. या कार्सला 2024-2025 च्या दरम्यान सादर केले जाणार आहे. टाटा अल्ट्रोज ईव्हीच्या (Tata Altroz EV) फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास कंपनीने टाटा अल्ट्रोजच्या आइसीइ मॉडेल्सच्या फीचर्सला यात सहभागी करु शकते. केबिनच्या रचनेत मात्र काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टाटा मोटर्स या दोन्ही कारच्या पहिले टाटा अल्ट्रोज हॅचबॅकचे ईव्ही व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारला या वर्षाच्या अखेरीस लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा अल्ट्रोज ईव्हीला सर्वात आधी 2020 ऑटो एक्सपोच्या दरम्यान शोकेश करण्यात आले आहे. परंतु नंतर कोरोना संसर्ग वाढल्याने या कारचे प्रोडक्शनाला काही प्रमाणात विलंब झाल्याचे दिसून येते.
चिप शॉर्टेजमुळे उत्पादनावर परिणाम
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित कार्सचे प्रोडक्शन आता सुरळीत सुरु झाले आहे. परंतु चिपसेटच्या शॉर्टेजच्या कारणामुळे यात पुन्हा व्यत्यय निर्माण झाला आहे. गेल्या एक ते दोन वर्षापासून जगभरातील कार मार्केटला चिपसेटच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ईव्ही सेगमेंट सर्वात लहान
पेट्रोल-डिझेल इंजिनच्या तुलनेत ईव्ही सेगमेंट अतिशय लहान आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. तसे पर्याय ईव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध नसतात. आतापर्यंत केवळ टाटा मोटर्समध्ये ईव्ही कार्समध्ये काही प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत. गाडीवाडीच्या रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स अल्ट्रोज ईव्ही सिंगल चार्जवर 300 किमीची ड्राइव्हिंग रेंज देऊ शकते.
टाटा अल्ट्रोजची संभाव्य वैशिष्ट्ये
टाटा अल्ट्रोज ईव्हीमध्ये देखील आइसीइ मॉडल्ससारखं फीचर्स देण्यात येतील. यात सात इंचाचा इंफोटेनमेंट बघायला मिळू शकतो. ज्यात, ॲड्रोइड ऑटो आणि कार प्लेला सपोर्ट मिळणार आहे. यात एक सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट मिळेल. त्याच प्रमाणे ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल्स देण्यात येणार आहे. सोबतच यात झेड कनेक्ट कार टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.