iPhone 14 : नवा कोरा ॲप्पलचा फोन घ्यायचा असेल तर थोडं थांबा, आयफोन 14 ‘या’ महिन्यात खरेदी करता येणार…

टिपस्टर LeaksApplePro नुसार, अॅप्पल 13 (Apple 13) सप्टेंबरला आयफोन 14 (iPhone 14) सिरीज लाँच करू शकते. मात्र, नेहमीप्रमाणे अॅप्पलने यावेळीही लाँचबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

iPhone 14 : नवा कोरा ॲप्पलचा फोन घ्यायचा असेल तर थोडं थांबा, आयफोन 14 'या' महिन्यात खरेदी करता येणार...
आयफोन 14 कधी लाँच होणार?
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:12 AM

मुंबई : आयफोन 14 सिरीजची लाँचिंग डेट (launch date) लिक झाली आहे. साधारणपणे अॅप्पल सप्टेंबरमध्ये त्यांचे नवीन आयफोन मॉडेल लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या वेळी कोरोनामुळे विक्रीला थोडा विलंब झाला होता, पण यावेळी तो होण्याची शक्यता कमी आहे. टिपस्टर LeaksApplePro नुसार, अॅप्पल 13 (Apple 13) सप्टेंबरला आयफोन 14 (iPhone 14) सिरीज लाँच करू शकते. मात्र, नेहमीप्रमाणे अॅप्पलने यावेळीही लाँचबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. कंपनीकडून लाँचच्या काही आठवडे आधी तारीख प्रसिद्ध करण्यात येत असली तरी अद्याप कुठलीही तारीख जाहिर करण्यात आलेली नाही.

लाँचिंग इव्हेंट ऑफलाइन की ऑनलाइन?

अॅप्पलचा हा लाँचिंग इव्हेंट ऑफलाइन असेल की ऑनलाइन, हेही सध्या स्पष्ट नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वाढत्या कोरोना केसेच्या पार्श्वभूमीवर अॅप्पलने पुन्हा एकदा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास नकार दिला आहे. लोक हायब्रीड मॉडेलवर कंपनीत काम करत राहतील. यामुळे, अशी अपेक्षा आहे, की यावेळी देखील कंपनी ऑनलाइन इव्हेंटमध्येच आयफोन 14 सिरीज लाँच करेल. रिपोर्टनुसार, आयफोन व्यतिरिक्त कंपनी या इव्हेंटमध्ये काही नवीन उत्पादने देखील लाँच करू शकते.

6 जूनला डेव्हलपर इव्हेंट

आयफोन 14 व्यतिरिक्त, कंपनी या इव्हेंटमध्ये AirPods Pro 2 आणि तीन नवीन Apple Watches लाँच करू शकते. सध्या, कंपनी 6 जूनपासून सुरू होणाऱ्या डेव्हलपर इव्हेंटची तयारी करत असून डेव्हलपर कॉन्फरन्स WWDC 2022 मध्ये पुढील मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच iOS 16 ची घोषणा करण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये या नवीन मोबाइल ओएसबद्दल तपशील दिले जातील.

यांची होणार लाँचिंग

iOS 16 व्यतिरिक्त, WWDC 2022 मध्ये, कंपनी WatchOS, iPadOS, MacOS सारखी नवीन सॉफ्टवेअर देखील लाँच करेल. आयफोन 14 च्या मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी आयफोन मिनी आणला जाणार नाही. टिपस्टरच्या मते, यावेळी आयफोन 14, आयफोन 14 Pro, आयफोन 14 Max आणि आयफोन 14 Pro Max लाँच केले जातील.

किंमत काय असेल?

किमतींबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंतच्या लिक्सवरून असे सांगण्यात आले आहे, की आयफोन 14 ची सुरुवातीची किंमत 799 डॉलर असेल, तर आयफोन 14 Pro Max ची किंमत जवळपास 2 हजार डॉलर असेल. यापैकी, आयफोन 14 Max हे वेगळे व्हर्जन असेल, ज्याची किंमत 899 डॉलरपर्यंत असू शकते.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.