Instagram Tips: लेआऊट फीचरद्वारे एकाच वेळी शेअर करा खूप फोटो, दूर होईल टेन्शन
युजर्स इन्स्टाग्राम वर एकापेक्षा जास्त फोटो एकाच इमेजमध्ये घेऊ शकतात. इन्स्टाग्रामच्या या फीचरमुळे, एकाहून अधिक फोटोज सिंगल इमेजमध्ये घेता येतात. तुम्हीही एक-एक फोट सिलेक्ट करून दमला असाल, तर हे फीचर तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
मुंबईः इन्स्टाग्राम हे एक फोटो शेअरिंग (Instagram App) ॲप आहे आणि याचे कोट्यावधी युजर्स इथे रोज भरपूर फोटोज (users share many photos) शेअर करत असतात. मात्र पोस्टमध्ये एकापेक्षा अधिक फोटो शेअर करायचे असल्यास प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी युजर्सना अनेक फोटोजचे कोलाज (photo collage) बनवून मगच ते शेअर करता येतात. मात्र आता असे करावे लागणार नाही, एका नव्या फीचरमुळे (New feature Layout) एका सिंगल इमेजमध्येच एकाहून अधिक फोटो शेअर करता येणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्रामने एक नवे फीचर आणले असून, त्यामुळे अनेक फोटोज एकाच इमेजमध्ये बसवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी युजर्स इन्स्टाग्रामच्या लेआऊट फीचरचा वापर करू शकतात, ज्यामध्ये एका इमेजमध्येच खूप फोटो फिट करणे शक्य आहे. इन्स्टाग्रामचे हे नवे फीचर कसे काम करते, हे जाणून घेऊया.
इन्स्टाग्रामचे लेआऊट ॲप
इन्स्टाग्रामचे लेआऊट फीचर हे गुगल प्ले स्टोअर वर स्वतंत्र ॲप म्हणूनही उपलब्ध आहे. युजर्सना हवे असल्यास ते हे ॲप डाऊनलोड करूनही लेआऊट फीचरचा लाभ घेऊ शकतात. लेआऊट ॲप उघडल्यानंतर तुम्ही कॅमेरा रोलमधून काही फोटोज सिलेक्ट केल्यास, आपोआप कस्टम लेआऊट प्रिव्ह्यू दिसू लागेल. इन्स्टाग्रामने या ॲपमध्ये Face ऑप्शन दिला आहे. या ऑप्शनमध्ये तुमच्या कॅमेरा रोलमधील सर्व फोटो दाखवले जातात, ज्यामध्ये विविध व्यक्ती दिसत आहेत.
असा बनवा लेआऊट
लेआऊट ॲपमध्ये तुम्ही सहजपणे फोटो निवडू शकता आणि ड्रॅग ॲंड ड्रॉप करू शकता. युजर्स त्यांच्या आवडीनुसार, फोटो मोठा करू शकतात अथवा लेआऊटध्ये फोटो फिट करण्यासाठी त्याची साईझही बदलू शकतात. मिरर सारखे इफेक्ट देण्यासाठी तुम्ही फोटो फ्लिप करू शकता किंवा तो रोटेटही होऊ शकतो.
इन्स्टाग्राम वर सिंगल फोटो तयार करण्याची पद्धत
जर तुम्हाला लेआऊट ॲप वापरायचे नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही इन्स्टाग्रामवरूनही हे काम करू शकता. इन्स्टाग्राममधील लेआऊट फीचरचा लाभ घ्यायचा असेल, तर खाली दिलेली पद्धत वापरून पहा .
– तुमच इन्स्टाग्राम अकाऊंट उघडा.
– वरील बाजूस असलेल्या Create New या पर्यायवर टॅप करा किंवा फीड वर कुठेही सरळ स्वाईप करा.
– त्यानंतर खालील बाजूस असलेल्या Story वर क्लिक करा.
– तेथे डावीकेडे Layout वर टॅप करा.
– खाली जाऊन कॅमेऱ्यामधून जे हवे असतील ते फोटो घ्या किंवा गॅलरीमधून फोटोज निवडा. फोटोंचा लेआऊट बदलण्यासाठी Change grid पर्यायावर टॅप करा.
– त्यानंतर खाली टॅप करावे आणि नंतर तळाशी डाव्या बाजूला Your Story पर्यायावर टॅप करून तुमची Story शेअर करावी.