‘हे’ अ‍ॅप सांगेल अनोळखी व्यक्तीची माहिती, जाणून घ्या

तुमच्या मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप असतील. त्यातही तुमच्याकडे शॉपिंग, गेमिंग किंवा अन्य अ‍ॅप अधिक असले तरी आम्ही सांगत असलेले अ‍ॅप तुमच्या फायद्याचे आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनची संपूर्ण कुंडली काढते. ज्यामध्ये तुमचे मेसेज, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट लिस्टचा समावेश आहे. जाणून घ्या.

‘हे’ अ‍ॅप सांगेल अनोळखी व्यक्तीची माहिती, जाणून घ्या
फोनची कुंडली एका सेकंदात हातात
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 1:48 PM

तुम्हाला ऑल-इन-वन म्हणजेच स्मार्टफोनमधील काही महत्त्वाची कामे करण्यासाठी एक अ‍ॅपविषयी सांगणार आहोत. या अ‍ॅपमध्ये तुमचे मेसेज, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट लिस्टचा समावेश आहे. स्मार्टफोनमध्ये दैनंदिन वापरासाठी अनेक अ‍ॅप्स असतात. पण, आम्ही सांगत असलेले अ‍ॅप खास आहे. तुमच्या मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप्स असतील. या अ‍ॅप्समध्ये किराणा सामान ऑर्डर करण्यासाठी, तसेच काही सोशल मीडियाचे अ‍ॅप्स असतील. पण, या सगळ्यादरम्यान एक अ‍ॅप्स असंही आहे जे जवळपास प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये आहे आणि त्यातून किराणा मागवला जात नाही किंवा सोशल मीडियाचे देखील हे अ‍ॅप नाही. मग हे अ‍ॅप नेमके कोणते आहे, याविषयी घ्या.

हे अ‍ॅप स्मार्टफोनची संपूर्ण कुंडली काढते. ज्यामध्ये तुमचे मेसेज, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट लिस्टचा समावेश आहे. खरं तर आम्ही ट्रूकॉलर अ‍ॅपबद्दल बोलत आहोत, जे सर्व स्मार्टफोन युजर्स वापरतात.

स्मार्टफोन युजर्स ‘या’ अ‍ॅपचा वापर का करतात?

हे सुद्धा वाचा

ट्रूकॉलरचा सर्वाधिक वापर नॉन-कॉलच्या माहितीसाठी केला जातो. जर तुम्हाला अशा व्यक्तीचा फोन आला ज्याचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये फीड झालेला नाही. त्यानंतरही ट्रूकॉलरच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सला कॉलरचे नाव कळते.

इन्स्टॉलेशनवर ‘ही’ परवानगी आवश्यक

ट्रूकॉलर इन्स्टॉल करताना हे अ‍ॅप मेसेज, कॉल डिटेल्स, कॉन्टॅक्ट लिस्ट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागते. जर तुम्ही या सर्व परवानग्या दिल्या तर कॉन्टॅक्ट लिस्टमधील तुमचे बँकिंग डिटेल्स ट्रूकॉलरपर्यंत पोहोचतात. अशावेळी तुमच्या प्रायव्हसीशी तडजोड होते. ज्यामध्ये तुमचा डेटा थर्ड पार्टीलाही विकला जाऊ शकतो. अशावेळी जेव्हा तुम्ही एखादे अ‍ॅप इन्स्टॉल कराल तेव्हा आधी मागितलेली परवानगी काळजीपूर्वक वाचा.

ट्रूकॉलर कसे कार्य करते?

ट्रूकॉलर अ‍ॅप स्वीडिश कंपनी ट्रू सॉफ्टवेअर सँडिनविया अ‍ॅबीचे आहे. कॉल ओळखण्यासाठी या कंपनीने सोशल मीडिया अ‍ॅपशी करार केला आहे. सोशल मीडिया अकाऊंटमध्ये तुमचा नंबर टाकला तर त्याची माहिती ट्रूकॉलरपर्यंत पोहोचते. यासोबतच एपीआय आणि एसडीके जे वेगवेगळे संगणक प्रोग्राम आहेत. त्यांच्या मदतीने ट्रूकॉलर नंबरही ओळखतो.

तुमचा डेटा विकला जाऊ शकतो?

लक्षात घ्या की, ट्रूकॉलरच नव्हे तर कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करताना मेसेज, कॉल डिटेल्स, कॉन्टॅक्ट लिस्ट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागते. ही परवानगी तुम्ही दिल्या तर कॉन्टॅक्ट लिस्टमधील तुमचे बँकिंग डिटेल्सला धोका निर्माण होतो. तुमच्या प्रायव्हसीशी तडजोड होते. यामध्ये तुमचा डेटा थर्ड पार्टीलाही विकला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एखादे अ‍ॅप इन्स्टॉल कराल तेव्हा आधी मागितलेली परवानगी काळजीपूर्वक वाचा.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....