Mobile network : खराब नेटवर्कमुळे झालात त्रस्त ? फोनमध्ये ऑन करा Wi-Fi Calling आणि बोला बिनधास्त

शहर असो किंवा गाव, खराब मोबाईल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉपचा त्रास सगळ्यांनाच सहन करावा लागतो. मात्र ही समस्या आता दूर होऊ शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला Wi-Fi Calling फीचर वापरावे लागेल.

Mobile network  : खराब नेटवर्कमुळे झालात त्रस्त ? फोनमध्ये ऑन करा Wi-Fi Calling आणि बोला बिनधास्त
खराब मोबाईल नेटवर्कImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 1:36 PM

मुंबई : घरात असो वा बाहेर, गावात असो वा शहरात , खराब मोबाईल नेटवर्कमुळे (Mobile network) कॉल ड्रॉपचा (Call drop) त्रास अनेकांना सहन करावा लागतो. फोनवर महत्वाचं काही बोलत असतानाच कॉल मध्येच कट होतो आणि आपण मात्र हॅलो- हॅलो करत बसतो. कोणताही मोबाईल (Mobile) फोन चांगला चालवायचा असेल, तर त्याचे नेटवर्कही चांगले असणे खूप महत्वाचे असते. कॉल ड्रॉपच्या समस्येवरील एक उपाय म्हणजे Wi-Fi Calling फीचर. ही काही नवी कन्सेप्ट नाही. अनेक टेलिकॉम ऑपरेटर्स भारतात ही सुविधा पुरवतात. या टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी असलात तरी तुम्हाला कॉल-ड्ऱॉपचा त्रास सहन करावा लागणार नाही. कोणत्याही व्यत्ययाविना तुम्ही आरामात फोनवर बोलू शकाल. सध्याच्या काळात, बरेचसे स्मार्टफोन Wi-Fi Calling फीचरला सपोर्ट करतात. ज्यांच्या घरात वा ऑफीसमध्ये Wi-Fiचं कनेक्शन आहे, त्यांच्यासाठी हे फीचर उत्तम आहे. हे फीचर नावाप्रमाणेच साधे- सोपे असून Wi-Fi नेटवर्कद्वारे कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होते.

Wi-Fi Calling म्हणजे नक्की काय ?

VoWiFi (Voice over Wi-Fi) द्वारे Wi-Fi नेटवर्क वर व्हॉइस म्हणजेच ऑडिओ अथवा व्हिडीओ कॉल करता येऊ शकतो. टेलिकॉम ऑपरेटर्स या फीचरद्वारे युजर्सना नेटवर्क ऐवजी इंटरनेटवर कॉल करण्याची सुविधा देतात. त्यामुळे तुमच्याकडे नेटवर्क कव्हरेज कमी असेल तर या फीचरचा वापर करून कॉल केल्यावर स्पष्ट आवाज येतो. या सेवेचा सर्वात मोठा फायदा त्या युजर्ससाठी आहे, जे प्रवास करतात आणि नेटवर्क जाण्याची चिंता करतात.

हे सुद्धा वाचा

Wi-Fi Calling कसे सुरू करावे ?

सगळ्या स्मार्टफोन्समध्ये Wi-Fi Calling फीचरला सपोर्ट नाही. त्यामुळे प्रथम, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ही सुविधा आहे की नाही, ते तपासून पहावे लागेल. त्यासाठी फोन सेटिंग्जमध्ये जाऊन Wi-Fi Calling, असे सर्च करावे. त्यानंतर कनेक्शन या पर्यायावर क्लिक करावे. समोर वाय-फाय असा पर्याय मिळाल्यास तो चालू करावा. नंतर तुम्ही तुमचा फोन कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर Wi-Fi Calling सेवा वापरू शकता. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वाय-फाय कनेक्शन चांगले असणे गरजेचे आहे, ते स्लो असल्यास कॉल करताना समस्या निर्माण होऊ शकते. Wi-Fi Calling ची ही सेवा ॲंड्रॉइड आणि आयफोन दोन्हींमध्ये उपलब्ध आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.