सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

Xiaomi 11i HyperCharge 6 जानेवारीला भारतात लाँच केला जाईल. पण त्यापूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहे. यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर मायक्रोपेज तयार करण्यात आले आहे.

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत...
Xiaomi 11i Hypercharge
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 4:00 PM

मुंबई : Xiaomi 11i HyperCharge 6 जानेवारीला भारतात लाँच केला जाईल. पण त्यापूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहे. यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर मायक्रोपेज तयार करण्यात आले आहे. हा केवळ सर्वात जलद चार्ज होणारा भारतातील पहिला फोन नाही तर MediaTek Dimensity 920 chipset सह येणारा पहिला फोन असेल. दरम्यान, या फोनच्या किंमतीबाबतही माहिती समोर आली आहे. (Xiaomi 11i hypercharge will available in India ata 25k to 30k price)

इंडिया टुडे टेकने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, Xiaomi इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर रघू रेड्डी यांनी सांगितले आहे की Xiaomi 11i हायपरचार्जची किंमत 25-30 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. या फोनसोबत 120W फास्ट चार्जर मिळेल.

Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल. कंपनीच्या मते, आगामी स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. 100W पेक्षा अधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीचा दावा आहे की 120W हायपरचार्ज सोल्यूशन केवळ 15 मिनिटांत 100 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.

Xiaomi 11i हायपरचार्जचे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल आणि त्याच स्पेसिफिकेशन्स सेटसह येईल. चीनमध्ये, Redmi Note 11 Pro+ 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह 6.67-इंच AMOLED पॅनेलसह येतो. डिस्प्लेमध्ये होल पंच समाविष्ट आहे ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर, स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलच्या डेप्थ सेन्सरसह 108-मेगापिक्सेलचा प्रायरमी कॅमेरा दिला जाईल.

हा फोन MediaTek Dimensity 920 चिपसेटसह सुसज्ज आहे, जो 8GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्ड सपोर्टद्वारे वाढवता येते. फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 120W फास्ट चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्ससह जोडलेला आहे.

फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 5G सपोर्ट, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट, JBL स्टीरिओ स्पीकर्स, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या फीचर्सचा यात समावेश आहे.

इतर बातम्या

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

(Xiaomi 11i hypercharge will available in India ata 25k to 30k price)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.