Amazon वर Xiaomi flagship days sale सुरु, अनेक दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी

Amazon India वर Xiaomi फ्लॅगशिप डे सेल (Xiaomi flagship days sale) सुरू झाला आहे, जो 11 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलदरम्यान भरघोस सूट आणि कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहेत.

Amazon वर Xiaomi flagship days sale सुरु, अनेक दमदार स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी
Mi 11X Pro
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 3:28 PM

मुंबई : Amazon India वर Xiaomi फ्लॅगशिप डे सेल (Xiaomi flagship days sale) सुरू झाला आहे, जो 11 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलदरम्यान भरघोस सूट आणि कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहेत. या डील्स आधीपासून अस्तित्वात असलेल्या Mi 11 सीरीज फोनवर उपलब्ध आहेत. यावर यूजर्सना 4000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच या सेल दरम्यान तुम्ही 5000 रुपयांपर्यंतचे इतर डिस्काऊंट मिळवू शकता. चला तर मग या फोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल तपशीलवार माहिती घेऊया. (Xiaomi flagship days sale Live on amazon, Buy Xiaomi Mi 10 5G, Mi 11X Pro, Mi 11X Xiaomi 11 Lite NE 5G with Discount)

Xiaomi 11 Lite NE 5G वरील डिस्काउंट आणि कॅशबॅक

Xiaomi 11 Lite NE 5G सेल दरम्यान 26,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये बेस व्हेरिएंट मिळेल. ही किंमत ICICI बँड डिस्काउंट नंतरची आहे. हा स्मार्टफोन Tuscany Coral, Diamond Dazzle, Vinyl Black आणि Jazz Blue या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईल फोनमध्ये 6.55 इंचाचा 10 बिट AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशनसह येतो. तसेच, यात 90hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा आणि तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल्सचा आहे. यात 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील आहे.

Mi 11X वरील डिस्काउंट आणि कॅशबॅक

Mi 11X हा एक परवडणारा फ्लॅगशिप फोन आहे, जो Xiaomi ने यावर्षी 29,999 रुपयांममध्ये लॉन्च केला होता. आता हा फोन 27999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. तसेच, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने यावर 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, तर जुना फोन एक्सचेंज केल्यास 5000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोन्स मिळू शकतो. Mi 11X 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा एक AMOLED डॉट डिस्प्ले आहे, जो 1080 × 2400 रिझोल्यूशनस येतो. या फोनमध्ये 2.76 मिमीचा अल्ट्रा टायनी पंच होल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR 10 Plus ला सपोर्ट करतो. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz ला सपोर्ट करतो, जे गेमिंग आणि स्क्रोलिंग सुधारते.

Mi 11X 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870G प्रोसेसर देण्यात आला आहे, जो Kryo 585 Octa-core सह येतो. तो 7nm वर प्रोसेस करतो. कंपनीने यामध्ये लिक्विड कूल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, जे स्मार्टफोन थंड ठेवण्याचे काम करते. या फोनमध्ये दोन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. यात 4520mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरसह येते. Mi 11X 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो आहे. तसेच 5 मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Mi 11X Pro वरील डिस्काउंट आणि कॅशबॅक

या सेलमध्ये Mi 11X Pro हा स्मार्टफोनदेखील डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा फोन 2500 रुपयांच्या इन्स्टंड डिस्काऊंटसह येतो आणि तुम्ही एक्सचेंजवर 5000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळवू शकता. Mi 11X Pro चे पहिले मॉडेल 8GB RAM तसेच 128GB स्टोअरेज क्षमतेचे असून त्याची मूळ किंमत 39,999 रुपये आहे. तर दुसरे मॉडेल हे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज क्षमतेचे असून त्याची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. या मोबाईलमध्ये 108 MP+ 8MP + 5MP ट्रिपल कॅमेरा सेन्सर प्रोव्हाईड करण्यात आले आहे. तसेच या मॉडेलची स्क्रीन 6.67 इंच असून चार्चिंगसाठी 4520 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात नवीन फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 870 आणि 888 प्रोसेसर दिला आहे. त्यासोबतच या मोबाईल्सना पॉवरफुल डॉल्बी स्टीरिओ स्पीकर, 120 Hz E4 सुपर AMOLED डिस्प्ले तसेच फास्ट चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी दिलेली आहे.

Xiaomi Mi 10 5G

Xiaomi Mi 10 5G मध्ये 6.67 इंच फुल HD + 3D कर्व्ह्ड डिस्प्ले आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि डॉट स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट वापरण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. तर 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,780mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोनदेखील सेलमध्ये डिस्काऊंटसह उपलब्ध आहे.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Xiaomi flagship days sale Live on amazon, Buy Xiaomi Mi 10 5G, Mi 11X Pro, Mi 11X Xiaomi 11 Lite NE 5G with Discount)

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...