Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Xiaomi च्या एमआय सेलवर मिळवा भरघोस डिस्काउंट, दिवाळीआधीच ऑफरचा धमाका…

शाओमीच्या Mi Sale तारखेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. एमआय सेल कधीपासून सुरू होणार याबाबत ग्राहकांच्या मनात उत्सूकता होती. आता त्याबाबत एक अपडेट देण्यात आली आहे. या सेलअंतर्गत स्मार्टफोनपासून इतर अनेक प्रोडक्टवर बंपर डिस्काउंट देण्यात आले आहे.

Xiaomi च्या एमआय सेलवर मिळवा भरघोस डिस्काउंट, दिवाळीआधीच ऑफरचा धमाका…
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:45 PM

नुकताच गणेशोत्सव झाला आहे. पुढील काळात नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी आदी विविध मोठे सण तोंडावर आहेत. सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने अनेक सेल पाईपलाइनमध्ये आहेत. शाओमीने (Xiaomi) एमआय सेलसाठी (Mi Sale) दिवाळीची तारीख जाहीर केली आहे. कंपनी या सेलचे नाव ‘टेक का शुभ मुहूर्त’ असे ठेवले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून इतर विविध इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर ऑफर (Offer) मिळणार आहेत.

कधी सुरु होणार सेल

शोओमीच्या ‘दिवाळी विथ एमआय सेल’ची ही सातवी एडिशन आहे, हा बहुचर्चित सेल 20 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनीकडून या सेलची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर 20 सप्टेंबरपासून हा दिवाळी सेल सुरू होईल. Mi.com वर विक्रीसाठी एक स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. वेबसाईटवरील माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी स्पिन द व्हील येथे ग्राहकांना मोफत शाओमी स्मार्ट टीव्ही जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, ग्राहक सुपर स्लॉट मशीनद्वारे रेडमी नोट 11SE मोफत जिंकू शकता. इतकंच नाही तर क्रॅकर रनमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्सशिवाय आणखी अनेक प्रोडक्ट जिंकण्याची संधी आहे.

‘ऑफर्स ऐसे जो कहीं और नहीं’

याशिवाय सेलअंतर्गत ‘ऑफर्स ऐसे जो कहीं और नहीं’ हा एक स्वतंत्र भाग तयार करण्यात आला असून याव्दारेही ग्राहकांना विविध डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. सेल सुरू झाल्यानंतर दररोज 12 वाजता Redmi Rush Hour मध्ये तुम्हाला Redmi प्रोडक्टवर अनेक खास डील्सचा अनुभव घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

गोल्डन अवरमध्ये घ्या लाभ

याशिवाय गोल्डन अवरमध्ये दररोज दुपारी 4 वाजता ग्राहकांना 10 हजारांपर्यंतची डिस्काउंट कूपन जिंकता येणार आहे. Half Price Store मध्ये दररोज संध्याकाळी 6 वाजता सेलमधील प्रोडक्टची विक्री अर्ध्या किमतींमध्ये करता येणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.