यूट्यूबचे नवे फीचर लाँच, अधिक पैसे कमवू शकतील व्हिडिओ क्रिएटर्स

यूट्यूबचे नवीन सुपर थँक्स फीचर केवळ 68 देशांमध्ये उपलब्ध आहे. आशा आहे की लवकरच सुपर थँक्स फीचर सर्व व्हिडिओ क्रिएटर्ससाठी जारी केले जाईल.

यूट्यूबचे नवे फीचर लाँच, अधिक पैसे कमवू शकतील व्हिडिओ क्रिएटर्स
यूट्यूबचे नवे फीचर लाँच, अधिक पैसे कमवू शकतील व्हिडिओ क्रिएटर्स
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:28 PM

नवी दिल्ली : यूट्यूब(YouTube)ने आपल्या युजर्स आणि क्रिएटर्ससाठी अनेक फीचर्स लाँच केली आहेत. यासोबत आता कंपनीने आणखी एक फीचर जाहीर केले आहे, ज्याचे नाव आहे सुपर थँक्स(Super Thanks). या फीचरद्वारे युजर्स त्यांच्या आवडत्या YouTube चॅनेलला टिप देऊ शकतात. यामुळे व्हिडिओ मेकर्सना पैसे कमविण्यास मदत होईल. तसेच या फिचरसह यूट्यूब फेसबुक(Facebook) आणि इंस्टाग्राम(Instagram)ला कडवी टक्कर देईल. युट्यूबच्या मते, सुपर थॅक्स फीचरद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या यूट्यूब निर्मात्यांना 2 डॉलर ते $ 50 पर्यंत टिप देऊ शकतात. देय देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, YouTube वापरकर्त्यांच्या कमेंटसह भरलेली रक्कम कमेंट सेक्शनमध्ये हायलाईट करेल. (YouTube’s new feature launch, video creators can make more money)

68 देशांमध्ये उपलब्ध आहे हे फीचर

यूट्यूबचे नवीन सुपर थँक्स फीचर केवळ 68 देशांमध्ये उपलब्ध आहे. आशा आहे की लवकरच सुपर थँक्स फीचर सर्व व्हिडिओ क्रिएटर्ससाठी जारी केले जाईल. युट्यूबने अलीकडेच भारतीय व्हिडिओ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सिमसिम(Simsim)च्या अधिग्रहणाची घोषणा केली होती. यामुळे भारतातील छोट्या उद्योगांना आणि किरकोळ विक्रेत्यांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तथापि, व्यवहाराच्या आर्थिक तपशीलांविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वापरकर्त्यांना युट्यूबवर सिमसिम ऑफर पाहायला मिळतील

ब्लॉगपोस्टच्या मते, वापरकर्त्यांना युट्यूबवर सिमसिम(Simsim) ऑफर पाहायला मिळतील. कंपनी त्यावर काम करत आहे. सिमसिमचे सहसंस्थापक अमित बागरिया, कुणाल सूरी आणि सौरभ वशिष्ठ यांनी सांगितले की आम्ही भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी सिमसिम प्लॅटफॉर्म सुरू केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही YouTube आणि Google इकोसिस्टमचा भाग आहोत. व्हिडिओ आणि निर्मात्यांच्या मदतीने आम्ही छोट्या व्यवसायांची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवू.

चाचणी विभागात आहे हे उत्कृष्ट फीचर

यूट्यूब लवकरच त्याच्या क्रिएटर्ससाठी एक खास फीचर घेऊन येत आहे, ज्याला चॅप्टर असे नाव देण्यात आले आहे. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम(Algorithms) तंत्रज्ञानावर आधारीत असेल. जेव्हा हे फीचर सक्रिय केले जाते, तेव्हा चॅप्टर व्हिडिओमध्ये जोडले जाईल. सध्या व्हिडिओ मेकर्स त्यांच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर जोडतात. (YouTube’s new feature launch, video creators can make more money)

इतर बातम्या

VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात…

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.