जुगाड तर बघा! 7 सीटर सायकल, सगळ्यांना बसवून निघाली स्वारी

हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात एक माणूस इलेक्ट्रिकची छोटी सायकल घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. आधी पाहिलं तर ती सामान्य इलेक्ट्रिक सायकलसारखी दिसत होती, पण ती बाहेर येताच...

जुगाड तर बघा! 7 सीटर सायकल, सगळ्यांना बसवून निघाली स्वारी
7 seater cycleImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 11:23 AM

जयपूर: देसी जुगाड वापरून लोक नवनवीन गोष्टी बनवत राहतात. अनेकदा लोक शेतीत या जुगाडाचा वापर करतात. अनेकदा ते ऑफिसमध्ये असं करतात. पण नुकतीच एक व्यक्ती व्हायरल झाली आहे, ज्याने रस्त्यावर देशी जुगाडचा वापर दाखवला आहे. त्याने एक सायकल अशा प्रकारे बनवली की त्यावर सात जण स्वार झाले आहेत. हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात एक माणूस इलेक्ट्रिकची छोटी सायकल घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. आधी पाहिलं तर ती सामान्य इलेक्ट्रिक सायकलसारखी दिसत होती, पण ती बाहेर येताच ती पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण त्या इलेक्ट्रिक सायकलमध्ये बदल करण्यात आला आहे.

या इलेक्ट्रिक सायकलला एक मजबूत लोखंडी पाईप जोडण्यात आला असून तो पाईप सात आसनी लांब करण्यात आला आहे. मग शेवटी ही सायकल कुठल्याही प्रयत्नाशिवाय चालावी म्हणून बॅटरी लावण्यात आलीये. इतकंच नाही तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो ही सायकल घेऊन रस्त्यावर उतरला आणि सोबत प्रत्येक सीटवर एक माणूस बसवला. पाहताना ही सायकल एखाद्या मोठ्या लांब अजगरासारखी वाटते.

नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांना धक्का बसला. एवढी छोटी सायकल एवढं ओझं कसं वाहून नेऊ शकते, असा प्रश्न काही जण विचारू लागले. पण त्यात लोखंडी पाईप दिसल्यावर लोकांना समजले की ते भक्कम पद्धतीने बनवलेले आहे आणि त्यासाठी मेहनतही घ्यावी लागलेली नाही, फारफार तर काय जुगाड करण्यासाठी डोकं लावावं लागलंय इतकंच.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.