Video: ज्या वयात हातात काठी येते, त्या वयात विमान चालवलं, 84 वर्षांच्या आजीबाईंची गगनभरारी!

वयाच्या 84 व्या वर्षी एका महिलेने विमान उडवून जगाला आश्चर्यचकित केले आहे. या आजीबाईचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आश्चर्य वाटते की, या आजीबाईने वयाच्या या टप्प्यावरही असा पराक्रम कसा केला असेल?

Video: ज्या वयात हातात काठी येते, त्या वयात विमान चालवलं, 84 वर्षांच्या आजीबाईंची गगनभरारी!
84 वर्षांच्या आजीने विमान उडवलं
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 2:26 PM

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील आजीबाईचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये 90 वर्षींच्या आजीबाई महामार्गावर मारुती 800 चालवताना दिसल्या होत्या. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, प्रत्येकजण एक गोष्ट सांगत होता की, वय फक्त एक आकडा आहे. आताच हीच गोष्ट पुन्हा सिद्ध करणारं एक उदाहरण समोर आलं आहे. ताजं प्रकरण अमेरिकेतील आहे. जिथे वयाच्या 84 व्या वर्षी एका महिलेने विमान उडवून जगाला आश्चर्यचकित केले आहे. या आजीबाईचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आश्चर्य वाटते की, या आजीबाईने वयाच्या या टप्प्यावरही असा पराक्रम कसा केला असेल? (84 year old Woman Flies Plane video goes viral on social media left netizens amazed)

84 वर्षांच्या अमेरिकन महिलेच्या कारनाम्यांनी संपूर्ण जग हादरलं आहे. जेव्हा या महिलेला कळले की ती पार्किन्सन रोगाने ग्रस्त आहे. त्यावेळी आजीबाईंनी त्यांना त्याला जे आवडेल ते करायचे ठरवले. आणि मिर्टा गेज नावाच्या या महिलेने विमान उडवण्याचा पराक्रम केला आहे. मात्र आता लोकांना त्याच्या या पराक्रमावर विश्वास बसत नाही. तुमच्या माहितीसाठी, मिर्टा ही आजीबाई तिच्या तारुण्यात पायलट होती. याच कारणामुळे त्याला पुन्हा विमान उडवण्याची इच्छा पूर्ण करायची होती.

मिर्टाची ही इच्छा तिच्या मुलाने पूर्ण केली आहे. मिर्टा म्हणते की, तिने विमानाच्या कॉकपिटमध्ये पाऊल टाकताच तिच्या जुन्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला. मिर्टाने कॉकपिटमध्ये बसलेल्या मुलासह विमान उडवले.

पाहा व्हिडीओ:

मिर्टाचा मुलगा अर्लने एका मुलाखतीत सांगितले की, पार्किन्सनमुळे त्याच्या आईला दैनंदिन कामात खूप त्रास होत होता. अशा परिस्थितीत त्याने आईला आवडणाऱ्या गोष्टींची अशी यादी तयार केली. यानंतर मुलाने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी वैमानिकाशी संपर्क साधला. मग विमानात चढले आणि एक कधीही न विसरणारा भरारी घेतली.

हेही पाहा:

Video: हे रॉकस्टार नाहीत, मेघालयचे मुख्यमंत्री आहेत, पण आवाज आणि अंदाज रॉकस्टारपेक्षा कमी नाही!

Video: महाकाय अजगर गळ्यात घालून महिलेचा स्टंट, नेटकरी म्हणाले, बाई जपून, अजगराचा भरवसा नाय!

 

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.