VIDEO : नाकावर ऑक्सिजन, तरीही चेहऱ्यावर तेज, 95 वर्षांची कोरोनाबाधित आजी जेव्हा गरबा खेळते

सोशल मीडियावर सध्या एका आजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय (95 year old corona positive woman doing garba in Hospital)

VIDEO : नाकावर ऑक्सिजन, तरीही चेहऱ्यावर तेज, 95 वर्षांची कोरोनाबाधित आजी जेव्हा गरबा खेळते
नाकावर ऑक्सिजन तरीही हार मानणार नाही, 95 वर्षीय आजीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 10:25 PM

मुंबई : कोरोनाने प्रचंड छळलं. त्याने आमच्या लाखो माणसांचा बळी घेतला. पण आम्ही अजून थकलेलो नाहीत. आम्ही ही लढाई संयमाने आणि आणखी उत्साहाने लढणार. अजिबात डगमगणार नाहीत. त्याने आमच्या कितीही माणसांचा बळी घेतला तरीही आम्ही हार मानणार नाहीत. आम्ही जिद्दीने या कोरोना विषाणूचा नायनाट करणार, असा ध्येयच संपूर्ण मानवसृष्टीने घेतला आहे. त्यामुळे या लढ्याविरोधात संपूर्ण जग एकवटलं आहे. या लढ्यात प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढवणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. आतादेखील एका 95 वर्षांच्या आजीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर डोळ्यांमधून पाणी आल्याशिवाय राहणार नाही (95 year old corona positive woman doing garba in Hospital).

व्हिडीओत नेमकं काय आहे?

संबंधित व्हिडीओत एक 95 वर्षांची आजी गरबा खेळताना दिसत आहे. मात्र, ही आजी कोरोनाबाधित आहे. तिच्या नाकाला ऑक्सिजन लावलेलं आहे. मात्र, तरीही ती डगमगलेली नाही. ती संकटाला निर्भिडपणे सामोरे जात आहे. ती कोरोनाला न घाबरता त्याच्याविरोधात निर्भिडपणे लढा देत आहे. तिच्या चेहऱ्यावर तिच्यातील लढाऊ वृत्तीचं दर्शन घडतंय. त्यामुळे आजीबाईचा हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत (95 year old corona positive woman doing garba in Hospital).

सोशल मीडियांवर अनेकांकडून आजीचं कौतुक

संबंधित व्हिडीओला व्हायरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. 95 वर्षांच्या आजीचा अशा परिस्थितीत असलेला उत्साह हा खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून येत आहेत.

आजींचा गरबा खेळण्याचा व्हिडिओ बघा :

साताऱ्यात 93 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात 

कोरोना संकटात अनेक जणांचा बळी जात आहे. मात्र, या महामारीच्या भयानक संकटात काही वयस्कर रुग्ण यशस्वीपणे कोरोनावर मात करत असल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. साताऱ्यातील एका 93 वर्षीय आजोबांनी घरच्या घरी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टरांनी आजोबांवर उपचाराचा काहीच फायदा होणार नाही, असं म्हणून घरी पाठवलं होतं. मात्र आजोबांनी घरीच उपचारांना साथ देत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. सातारा जिल्ह्यातील 93 वर्षीय बाबूराव सुतार यांनी धीर सोडणाऱ्या कोरोनाग्रस्तांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

संबंधित बातमी : आजोबांना घरी न्या, उपचारांचा काही उपयोग नाही, 93 वर्षीय वृद्धाने कोरोनासोबत डॉक्टरांनाही हरवलं

हेही वाचा : Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.