एका यूट्यूबर तरूणाची वर्षाची कमाई तब्बल 45 कोटी, वाचा काय शक्कल लढवली?
अमेरिकेतील एका यूट्यूबर तरुणाची वर्षाची कमाई तब्बल 45 कोटी रुपये आहे. आकाड ऐकूण तुम्हीही आवाक झाला असेल. मात्र सोशल मीडियाचा योग्य वापर तुम्हाला करोडपतीही बनवू शकतो.
सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, जो रातोरात एखाद्याला हिरो बनवतो आणि एखाद्याला झिरोही बनवतो. याचा हुशारीने योग्य वापर केल्यास तुम्ही करोडपतीही होऊ शकता. अमेरिकेतील एका यूट्यूबर तरुणाची वर्षाची कमाई तब्बल 45 कोटी रुपये आहे. आकाड ऐकूण तुम्हीही आवाक झाला असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा काय करतो हा तरुण? ज्यातून त्याला वर्षाला तब्बल 45 कोटी रुपये मिळतात.
यूट्यूबने नशीब चमकवले आणि खिसाही
अमेरिकतल्या ग्राहम स्टीफन नावाच्या तरूणाची ही काहणी आहे. ज्याचं नशीब फक्त एक वर्षात पालटलं. या तरुणाने वयाच्या 13 व्या वर्षी अॅक्वेरियम सेलरची नोकरी पत्करली. ही नोकरी त्याने 3 वर्षे केली. त्यानंतर तो रॉक बँड ड्रमर बनला. त्यानंतर 2008 मध्ये त्याने इस्टेट एजन्सी सुरू केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर याने एक यूट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनलवर तो पर्सनल फायनान्स आणि रिअल इस्टेट गुतवणूक यासंदर्भात व्डिडिओ पोस्ट करू लागला. त्याच्या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि हळूहळू त्याचे नशीब बदलू लागले.
पूर्णवेळ यूट्यूवर काम
2017 हजार साली त्याने सर्व जबाबदाऱ्या झटकून पूर्णवेळ यूट्यूबसाठी काम करण्यास सुरूवात केली. आणि पहिल्याच वर्षी त्याने 19 लाख रुपये मिळवले. त्याचा हा प्रवास बहरत गेला आणि बघता बघता त्याची कमाई 45 कोटी रुपयांवर पोहचली. आता त्याचे दोन यूट्यूब चॅनल आहेत. त्यातून त्याची मोठी कमाई होते. त्याला जाहिराती, ऑनलाई कोर्स, रिअल इस्टेट एजंट, स्पॉनसर्स यातून पैसे मिळतात. तसेच अॅमेझॉनच्या सहकारी संस्थांकडून आणि कंपन्यांचा सल्लागार म्हणूनही त्याची तगडी कमाई होते. त्यामुळे सध्या त्याने पूर्ण फोकस यूट्यूवर ठेवला आहे.