AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाने लग्नासाठी स्वस्त घागरा दिला म्हणून मुलीचा लग्नास नकार

महागडा घागरा न दिल्यामुळे एका मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यास लग्न करण्यास नकार दिला.

नवरदेवाने लग्नासाठी स्वस्त घागरा दिला म्हणून मुलीचा लग्नास नकार
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 19, 2022 | 3:33 PM
Share

भारतीय लग्नांमध्ये मनोरंजन म्हणजे एकदम कमाल असतं. तुम्ही जर पाहुणे असाल, लग्नात उपस्थित असाल किंवा तुमचं स्वतःचं जरी लग्न असेल तरी तुम्ही ते अनुभवलंच असेल. लग्नातले अनेक किस्से तुम्हाला उठता बसता ऐकायला येत असतील. कारण भारतात लग्न दोन लोकांमध्ये नाही, दोन कुटूंबामध्ये होतं. मग काय मनोरंजन तर होणारच.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील एका मुलीने महागडा घागरा न दिल्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्यास लग्न करण्यास नकार दिला.

हल्द्वानीच्या राजपुरा परिसरातील एका मुलीचा आधीच साखरपुडा झाला होता. नवरदेवाच्या घरच्यांनी तिच्यासाठी केवळ १० हजार रुपयांत लेहंगा खरेदी केल्याचे नवरीला कळाले तेव्हा नवरीने रागाच्या भरात तो फेकला.

मात्र, नवरदेवाच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, त्यांनी लखनऊहून एक लेहंगा वधूसाठी खरेदी केला होता.

एका मीडिया रिपोर्टनुसार, हेल्थकेअर सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या रानीखेतच्या मुलासोबत या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यानंतर जसजशी तारीख जवळ येत गेली, तसतशी लग्नासाठी कार्ड बनवून त्याचे वाटप करण्यात आले.

या महिन्याच्या सुरुवातीला ५ नोव्हेंबर रोजी या जोडप्याचे लग्न होणार होते. लग्नाची सर्व तयारी ५ नोव्हेंबरला पूर्ण झाली. नवरदेवाने आणलेला लेहंगा पाहून मुलीचा हिरमोड झाला आणि तिने मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.

स्थानिक रिपोर्टनुसार, नवरदेवाच्या वडिलांनी मुलीला तिच्या आवडीचा लेहंगा खरेदी करण्यासाठी त्याचे एटीएम कार्डही दिले. तेही निरर्थक होते.

अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं, मात्र तरीही तोडगा निघाला नाही. तासनतास झालेल्या वादावादीनंतर ही बाब कोतवाली पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि अखेर दोन्ही कुटुंबांनी तोडगा काढला.

लग्न रद्द करण्यात आले आणि दोन्ही पक्षांना लग्न नाकारण्यात आले. हल्द्वानीमध्ये पोलिसांनी केस मिटवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले.

दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या वादानंतर वेगळे होणेच योग्य ठरेल, असा दोन्ही बाजूंचा समज झाला.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.