AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: चिडलेल्या गायीची थेट दुचाकीस्वाराला धडक, ब्राझिलमधला धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला गाय आदळते. दुचाकीस्वाराला काही समजेल तोपर्यंत तो उडी मारून रस्त्यावर पडतो. त्यानंतर गाय तिथून निघून जाते.

Video: चिडलेल्या गायीची थेट दुचाकीस्वाराला धडक, ब्राझिलमधला धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
गायीची बाईकला धडक
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 9:07 AM
Share

सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. यातील काही व्हिडीओ असे आहेत की, ते पाहून आपल्याला हसू येते. तर, काहींना पाहून आश्चर्यही वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की या बिचाऱ्या गरीब बाईक रायडरने असं काय केले, ज्यामुळे त्याला ही शिक्षा मिळाली. (Animal Attack Video Viral Video Cow Runs into Street and Knocks Over Motorcyclist Brazil)

ब्राझिलमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक गाय अचानक धावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ट्रॅफिक सिग्नलवर गाय सरळ धावत येते. रस्त्यावरुन वाहनं भरधाव वेगाने जात असतात. त्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला गाय आदळते. दुचाकीस्वाराला काही समजेल तोपर्यंत तो उडी मारून रस्त्यावर पडतो. त्यानंतर गाय तिथून निघून जाते.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्षणभर धक्का बसला असेल. कारण हे बाईक रायडरच्या जीवावर बेतलं असतं. दुचाकीस्वाराला कल्पनाही नव्हती की एक गाय त्याच्या दिशेने धावत येत आहे. अशा परिस्थितीत त्याला सावरण्याची संधीही मिळाली नाही. सुदैवाने गायीने मारल्यानंतर त्याला फारशी दुखापत झाली नाही.

व्हायरल हॉगने हा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्यावेळी तो त्याच्या कारमध्ये एका मित्राची वाट पाहत होता. तेवढ्यात एक गाय धावत आली आणि थेट दुचाकीस्वाराला धडकली. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 83 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हेही पाहा:

Video: कित्येक फूट लांब, आणि शेकडो किलोचा अजगर पाठीवर, सर्पमित्राचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल!

Diwali 2021 Video: चटक चांदणी, चतूर कामिनी, काय म्हणायचं हीला, ही आहे तरी कोण, बाई की लाईटचं दुकान?

 

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.