Video: चिंपांझींना ड्रोन उडवताना पाहिल्यावर तुम्ही नक्की म्हणाल खरंच हेच आपले पूर्वज आहेत!
व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन चिंपांझी चक्क ड्रोन उडवताना दिसत आहेत. एकाने रिमोट धरला आहे, तर दुसरा स्क्रीनवर ड्रोनमध्ये टिपलेली दृश्यं पाहत आहे.
माकडांना आपण आपले पूर्वज मानतो. पण काही माकडांचा सभ्यतेच्या विकासासोबत विकास झाला आणि आजचा आधुनिक माणूस तयार झाला. बरेच लोक याच्याशी सहमत आहेत, तर बरेच लोक या सिद्धांताशी असहमत देखील आहेत. तथापि, हा एक वेगळा विषय आहे. पण जर तुम्ही माकडांचा कृती बारकाईने पाहिल्या तर तुम्हाला असे वाटेल की ते खरेच आपले पूर्वज असतील. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, जे हे सिद्ध करतात. सध्या चिंपांझीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्या ते त्यांच्या बुद्धिमत्तेने लोकांची मने जिंकत आहे. (Animal Viral Video of Chimpanzee that Flying drone very easily people Amazed that watching)
चिंपांझीचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यावरून ही प्रजाती माकडांमध्ये सर्वात हुशार असल्याचे सिद्ध होते. चिंपांझी कपडे धुतानाचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन चिंपांझी चक्क ड्रोन उडवताना दिसत आहेत. एकाने रिमोट धरला आहे, तर दुसरा स्क्रीनवर ड्रोनमध्ये टिपलेली दृश्यं पाहत आहे. हे दृश्य खरोखर आश्चर्यकारक आहे. तुम्ही यापूर्वी असे कधीही पाहिले नसेल.
चला तर मग पाहूया हा मजेदार व्हिडिओ.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, चिंपांझी एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे ड्रोन पायलटप्रमाणे ड्रोन उडवत आहेच, पण रिमोटही अगदी सहज नियंत्रित करत आहे. या व्हिडीओमध्ये किती सत्यता आहे हे माहीत नसले तरी माकडाने ड्रोन उडवताना पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
इंस्टाग्रामवर wildsoftplanet नावाच्या अकाऊंटवर हा अतिशय मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. आतापर्यंत सुमारे 4 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले, हे एक अद्भुत दृश्य आहे. त्याचवेळी, आणखी एका युजरने मजेशीर टोनमध्ये कमेंट करताना लिहिले आहे की, ‘चिंपांझी जरूर विचार करत असतील की आता मी सर्व केळी सहज झाडावरुन काढू शकतो.’ तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, हा चिंपांझी खूप हुशार आहे. एकूणच, बहुतेक नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप मजेदार वाटला. बहुतेक लोकांनी इमोटिकॉन्सच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही पाहा: