Video : इवल्याशा पक्ष्याचा गोड चिवचिवाट, खट्याळपणे म्हणतोय I Love You, व्हिडीओ पाहाच
यावेळी व्हायरल होणारा व्हिडीओ हा अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक पक्षी आपल्या गोड आवाजात I love You म्हणत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. पक्ष्यांचा चिवचिवाट सर्वांनाच आवडतो. याच कारणांमुळे विविध पक्ष्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. यावेळी व्हायरल होणारा व्हिडीओ हा अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एक पक्षी आपल्या गोड आवाजात I love You म्हणत आहे. (Arlo bird nicely saying c video goes viral on social media)
गोड आवाजात पक्षी म्हणतोय आय लव्ह यू
आपण एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करतो, तो क्षण सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय असाच असतो. या व्हिडीओमध्येसुद्धा एक पक्षी मोठ्या दिमाखात आय लव्ह यू म्हणत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हरखून जाल. व्हिडीओमध्ये Arlo नावाचा पक्षी एका संगमरवरी फरशीवर उभा असल्याचे दिसतेय. त्याच्या बाजूला एक माणूस आणि महिला आहेत. उभी असलेली महिला व्हिडीओ रेकॉर्ड करते आहे. यावेळी Arlo हा पक्षी फरशीवर इकडून तिकडे चालतो आहे. चालताना तो अगदी मजेदारपणे त्याच्या आवाजात ओरडतो आहे. तो ‘आय लव्ह यू’ म्हणत असल्यासारखे वाटत आहे. एकदा नाही तर दोनवेळा तो सारखेच ओरडून आय लव्ह यू म्हणतोय.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या Arlo पक्ष्याला Pacific Parrotlet सुद्धा म्हटले जाते. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामने आपल्या ऑफिशयल अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले असून त्यावर अनेकांनी उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
इतर बातम्या :
Video : हततीच्या! हत्तीने हत्तीला आणले नियंत्रणात; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही दंग व्हाल!
Video | मांस खाण्यासाठी दोघांची चढाओढ, बिबट्याचा मास्टरस्ट्रोक एकदा पाहाच
Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ
(Arlo bird nicely saying I Love You video goes viral on social media)
लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा, योजनेचं उद्घाटन, अनिल परबांची घोषणा https://t.co/3ks7ylHFjQ @advanilparab @OfficeofUT @CMOMaharashtra #LearningLicense #RTO #AnilParab #UddhavThackeray #DrivingLicense
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021