अय्यो! 61 वर्षीय व्यक्ती 88 व्यांदा लग्न करणार
जरी ते विभक्त झाले तरी त्याची माजी पत्नी अजूनही त्याच्यावर प्रेम करते असा नवरदेवाने खुलासा केलाय.

इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील माजलेंग्का येथील 61 वर्षीय व्यक्ती 88 व्यांदा लग्न करणार आहे. द ट्रिब्यून न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कान असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून तो आपलं 86 वं लग्न आपल्या माजी पत्नीशी लग्न करणार आहे. इतक्या वेळा लग्न केल्यामुळे या व्यक्तीला ‘प्लेबॉय किंग’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. 61 वर्षीय शेतकरी कान यांनी सांगितले की, ते त्या महिलेला आपल्याकडे परत येण्यास नकार देऊ शकत नाहीत.
जरी त्यांचे लग्न त्या वेळी फक्त एक महिना टिकले आणि त्यानंतर ते विभक्त झाले तरी त्याची माजी पत्नी अजूनही त्याच्यावर प्रेम करते असा नवरदेवाने खुलासा केलाय.
“आम्ही विभक्त होऊन बराच काळ लोटला असला, तरी आमच्यातील प्रेम अजूनही दृढ आहे” असं शेतकरी कान म्हणाले.
जेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता तेव्हा त्याने पहिले लग्न केले होते आणि त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. “तेव्हा माझ्या वाईट वृत्तीमुळे माझ्या पत्नीने लग्नाच्या दोन वर्षानंतर घटस्फोट मागितला होता,” असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
या घटनेमुळे 61 वर्षीय कान यांनी आपल्याला राग येत असल्याचे कबूल केले, त्यामुळे त्यांनंतर अनेक स्त्रियांना त्याच्या प्रेमात पडण्यासाठी त्यानी आपल्या रागावर नियंत्रण आणलं. कान यांनी असेही म्हटले आहे की, “मला असे काम करायचे नाही जे महिलांसाठी चांगले नाही.
