Viral: घाईघाईत कबाब खाल्ला, घशात अडकला! एका मॉडेलला जीव गमवावा लागला…
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल अरिसारा कारबदेचो हिने कबाब इतक्या घाईघाईत खाल्ले की ते खाल्ल्यानंतर तो घशात अडकला आणि तिला गुदमरू लागले. ती गुदमरली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले.
आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं कि जेवण हे शांत बसून, निवांत बसून करायला हवं. एक एक घास चावून खायला हवा. जेवताना घाई करू नये, मन लाऊन जेवावं. असं का ? आपण असल्या सल्ल्यांकडे फारसं लक्ष देत नाही. एका कानाने ऐकून एका कानाने सोडून देतो. पण हा किस्सा वाचून तुम्ही पुन्हा जेवण घाईघाईत करायची चूक करणार नाही. थायलंडच्या एका मॉडेलसोबत (Model From Thailand) एक अतिशय विचित्र अपघात झालाय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि मॉडेल अरिसारा कारबदेचो (Arisara Karbdecho) हिने कबाब इतक्या घाईघाईत खाल्ले की ते खाल्ल्यानंतर तो घशात अडकला आणि तिला गुदमरू लागले. ती गुदमरली त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले.
दोन महिने लाइफ सपोर्टवर
तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला रुग्णालयात लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. पण दोन महिने लाइफ सपोर्टवर राहूनही तिचा जीव वाचू शकला नाही. मॉडेलचे वय फक्त 27 वर्षे होते. तिच्या कुटुंबीयांनी या दु:खद वृत्ताला दुजोरा दिलाय. या मॉडेलचे लाखो चाहते होते, तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या फॅन्सने या वृत्ताविषयी दुःख व्यक्त केलंय. ही बातमी वाचून जेवण शांततेत आणि वेळ काढून का करायला हवं हे कळतं.
या मॉडेलचे लाखो फॉलोअर्स आहेत
मॉडेलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे 15 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अरिसारा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होती. मॉडेल इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह होती आणि अनेकदा स्वतःचे नवीन फोटो पोस्ट करत असे. मिररच्या रिपोर्टनुसार, या मॉडेलच्या आईनं सांगितलं की, बिझी असल्यामुळे घाईघाईत ती जेवण खात होती. डुकराचे मांस, कबाब आणि भात खात असताना तिच्या घशात मांसाचा तुकडा अडकला होता.
View this post on Instagram
9 मिनिटांच्या विलंबामुळे हा अपघात झाला
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अरिसारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास 9 मिनिटांचा उशीर झाला, ज्यामुळे तिचा जीव वाचू शकला नाही. खरं तर ऑक्सिजन तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता, म्हणून तिला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. अरिसाराच्या आईने तरुणांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.