Video: सर्फिंग करण्यासाठी समुद्रात गेला, आणि शार्कने त्याला वेढलं, व्हिडीओ पाहुन नेटकरी हादरले!
सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जिथं समुद्रात सर्फिंगचा आनंद घेणाऱ्या एकाला शार्कनं वेढलं, पण नशीब बलवत्तर म्हणून हा भाऊ बचावला.
तुम्ही टीव्हीवर वा इंटरनेटवर शार्क (Shark)च्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. शार्क हा समुद्रातील असा मासा आहे, जो माणसालाही सहज आपलं भक्ष्य बनवू शकतो. गेल्या काही वर्षात शार्कचे माणसांवरील हल्ले (Shark Attack) कमालीचे वाढले आहेत. अनेक देशांमध्ये शार्कच्या हल्ल्यांच्या नोंदी आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जिथं समुद्रात सर्फिंगचा आनंद घेणाऱ्या एकाला शार्कनं वेढलं, पण नशीब बलवत्तर म्हणून हा भाऊ बचावला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच ( Shark viral video)व्हायरल होत आहे. (Attempted shark attack on a surfer living in Florida, USA, video goes viral )
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एली मॅकडोनाल्ड आणि त्याची होणारी बायको लॉरा इव्हान्स सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी ब्रेवर्ड काउंटीच्या बीचवर पोहचले. समुद्राच्या उंच लाटा बघताच एलीला सर्फिंग करु वाटलं, त्यामुळेच त्याने आपला सर्फबोर्ड उचलला आणि समुद्रात गेला. त्याची होणारी बायको लॉरा बीचवर उभं राहुन त्याचा व्हिडीओ बनवत होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एली समुद्रात पोहचल्यावर, त्याच्याजवळ काही लहान मासे आले. तो त्यांना काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतच होता, तेवढ्यात त्याची नजर जवळच घिरट्या घालणाऱ्या शार्कवर पडली. एली हे दृश्य पाहून हादरला. जेव्हा त्याने आजूबाजूला नीट पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही शार्क त्याच्याभोवतीच घिरट्या घालत होती.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
लॉरा म्हणाली- “एलीजवळ शार्क दिसताच मला भीती वाटली. मला आधी जोरात किंचाळवं आणि त्याला वाचवण्यासाठी समुद्रात जावं असं वाटलं, पण मी आधी स्वतःला शांत केलं आणि विचार केला की, एलीला अशा परिस्थितीत काय करावं हे चांगलंच माहित आहे. मला हे देखील माहित होते की, अशी परिस्थिती एलीसाठी रोमांचकारी असेल, म्हणून मी लगेच तिचे फोटो काढणे आणि तिचे व्हिडिओ बनवणं सुरू केले. ” तेवढ्यात एली पटकन समुद्राबाहेर आला आणि त्या दिवशी त्याचा जीव वाचला. पण एलीचा उत्साह इतका मजबूत होता की, दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा सर्फिंग सुरू केलं. एलीच्या या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बरेच लोक व्हिडिओ पाहून घाबरत आहेत, तर एका जाणकार सर्फरने सांगितले की, ती स्पिनर शार्क असले पाहिजेत, जे सहसा हल्ला करत नाहीत. हे शार्क अटलांटिक महासागरात सापडतात.
हेही पाहा: