Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सध्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले असून या अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय.

Video | भरधाव वेगात आलेल्या कारची रिक्षाला धडक, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
अशा प्रकारे अपघात झाला.
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 3:45 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून अंगाचा थरकाप उडतो. सध्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले असून हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. (auto rickshaw and car accident video went viral on social media)

भरधाव गेवात आलेल्या कारने दिली रिक्षाला धडक

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका अपघाताचा आहे. या व्हिडीओमध्ये एक कार भरधाव वेगात समोर येताना दिसते आहे. तर दुसरीकडून एक रिक्षा रस्ता पार करत आहे. यावेळी समोरून जी कार येत आहे, ती अतिशय वेगात असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे जवळपास अशक्य असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडून रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाचा वेग कमी असला तरी तो चौकामध्ये आल्यामुळे सगळे कठीण होऊन बसले आहे. त्यानंतर समोर रिक्षा मध्ये आल्याचे पाहताच कारचालक घाबरला आहे. त्याने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण वेग जास्त असल्यामुळे शेवटी कारने रिक्षाला जोरदार धडक दिली आहे.

महिलने चालत्या रिक्षातून उडी मारली

जोराची धडक दिल्यामुळे रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले आहे. रिक्षाचा पूर्ण काच फुटला असून व्हिडीओमध्ये रिक्षाचालक रस्त्यावर पडल्याचे आपल्याला दिसते आहे. तसेच रिक्षाचालक खाली पडल्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले असून रिक्षा समोर जाताना आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. रिक्षा समोर जात असल्याचे दिसताच रिक्षात बसलेली महिला प्रवासी चांगलीच घाबरली आहे. नंतर या महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारली आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ?MannThigli? (@vip.chobbar)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा अपघात कोठे घडला याबद्दल नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, व्हिडीओतील अपघाताची तीव्रता लक्षात घेता लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. तसेच या अपघाताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

पाणी साचलेल्या रस्त्यावरुन चालणे कठीण, नवरीला थेट खांद्यावर उचललं, नवरदेवाची एकच चर्चा

Video | मांस फस्त करण्यासाठी वाघांची धडपड, हवेत झेप घेताच थेट पाण्यात पडले, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | रस्ता ओलांडण्यासाठी मुलांची धडपड, मध्येच ट्रक आला अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

(auto rickshaw and car accident video went viral on social media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.