Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या लहान पिल्लांनी दुधाच्या बॉटलभोवती चांगलीच गर्दी केली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ छोट्या मुलांचेदेखील असतात. लहान मुलं तसेच प्राण्यांच्या पिलांचे व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष रुपाने आवडतात. वेगवेगळ्या प्राण्यांच्या लहान पिल्लांनी केलेल्या गोड हरकती सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या लहान पिल्लांनी दुधाच्या बॉटलभोवती चांगलीच गर्दी केली आहे. (baby elephant grabbing milk bottle video went viral on social media)
ट्रॉलीमध्ये दूध दिसताच पिलांनी गर्दी केली
या व्हिडीओमध्ये हत्तीची छोटी पिल्लं दिसत आहेत. त्यांच्यासमोर दुधाची एक मोठी ट्रॉली ठेवण्यात आली आहे. ट्रॉलीमध्ये दूध दिसताच पिलांनी या ट्रॉलभोवती गर्दी केली आहे. तसेच ट्रॉलीमधील दूध पिण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हत्तीच्या पिल्लांचा हा प्रयत्न नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
Waste not, want not – the Nursery orphans are always plotting a milk heist! pic.twitter.com/tjl1DvQncY
— Sheldrick Wildlife (@SheldrickTrust) July 31, 2021
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Sheldrick Wildlife या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने हत्तीच्या पिल्लांची प्रशंसा केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ज्या प्रकारे ही पिल्लं दूध शोधत आहेत, त्यावरुन ते समजदार असल्याचं वाटतंय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांना हत्तीच्या पिल्लांची दुधाच्या बॉटल्स शोधण्याची पद्धत विशेष आवडली आहे.
इतर बातम्या :
Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !
पुण्यातील ‘ती’ मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा
(baby elephant grabbing milk bottle video went viral on social media)