Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान

Special Story : आपली संपत्ती दान करताना राजेंद्र यांनी आपली गाडी, घर तसंच आपल्या मालकीची जमीनदेखील सरकारच्या नावावर केली आहे. 23 जुलै 2021 रोजी त्यांनी आपली संपत्ती सरकारच्या नावे केल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे.

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान
पाच कोटीची संपत्ती दान करणारा डॉक्टर
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 5:55 PM

बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरा जन्मभर धडपडत असतो. बायकोचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, इतकं प्रेम करणारे पती आजही या जगात आहेत, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एकानं बायकोच्या मरणानंतरही तिचा शब्द प्रमाण ठेवत तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठा धाडसी निर्णय घेतलाय. एका डॉक्टर पतीनं चक्क आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती बायकोच्या शब्दाखातर दान केली आहे. अत्यंत हृदयस्पर्शी असणाऱ्या या लव्हस्टोरीचं (Love Story) वृत्त आजतकनं दिलं आहे. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एका डॉक्टरनं आपल्या पत्नीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. आहे. डॉक्टर पतीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेतलाय. या दाम्पत्याला अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती थेट सरकारलाच दान दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणी दिली दान?

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका निवृत्त डॉक्टरनं आपली पाच कोटी रुपयांची संपत्ती हिमाचल प्रदेश सरकारला दान दिली आहे. या डॉक्टरनं तयार दिलेलं हे दान संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनलंय. आपल्या बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर पतीननं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

असं का केलं?

हिमाचल प्रदेशच्या नादौनमधील जोसलप्पड गावातील डॉक्टर राजेंद्र कंवर राहतात. ते आरोग्य विभागात काम करायचे आता निवृत्त झाले असून त्यांची पत्नी शिक्षण खात्यात नोकरीला होता. दोघंही निवृत्त झाली आहे. या दोघांनाही मूलबाळ नाही. एक वर्षापूर्वी राजेंद्र यांची पत्नी कृष्णा कंवर यांचं निधन झालं. त्यानंतर राजेंद्र यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत अखेर चर्चा करत, मूल बाळ नसल्यामुळे आपली संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पाच कोटी रुपयांची संपत्ती राजेंद्र यांनी आपल्या पत्नीच्या अखेरच्या इच्छेखातर दान केली आहे.

आपली संपत्ती दान करताना राजेंद्र यांनी आपली गाडी, घर तसंच आपल्या मालकीची जमीनदेखील सरकारच्या नावावर केली आहे. 23 जुलै 2021 रोजी त्यांनी आपली संपत्ती सरकारच्या नावे केल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. आपल्या घरात बेघर वरीष्ठ नागरिकांना राहण्यासाठी आपल्या घरात स्थान मिळावं, या उदात्त भावनेनं त्यांनी आपलं घर, जमीन आणि गाडी दान केली आहे. म्हातारपणात वरिष्ठांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी त्यांनी पत्नीच्या इच्छेनुसार तिच्या मृत्यूनंतर आपल्या कोट्यवधींची संपत्ती दान केली आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | ‘लेडी सिंघम’ मोक्षदा पाटील यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत कसे अडकले आस्तिककुमार?

Special Story | जिगरबाज IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं अरेंज ते लव्ह मॅरेज

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.